MB NEWS-फेसबुक वर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी एकाला अटक _मोठ्या संख्येने मुस्लिम धर्मीय पोलीस ठाण्यात_

फेसबुक वर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी एकाला अटक



_मोठ्या संख्येने मुस्लिम धर्मीय पोलीस ठाण्यात_ 


परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
       फेसबुकवर अक्षेेपार्ह मजकूर लिहून मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावल्या असल्याच्या तक्रारीवरून मोठ्या संख्येने मुस्लिम धर्मीय समाज बांधव पोलीस ठाण्यात जमा झाले होते. याप्रकरणी एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
       याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, शहरातील माणिक नगर भागातील रहिवासी एका युवकाने आपल्या फेसबुक अकाउंट वरून मुस्लिम धर्माच्या भावना दुखतील अशा प्रकारची पोस्ट केली. दोन धर्मात सोशल मीडियाच्या माध्यमातून तेढ निर्माण होईल अशा प्रकारचा मजकूर लिहिला. म्हणून या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी शहरातील मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यात जमा होऊन आक्रमक झाले होते. या प्रकरणी संबंधित युवकावर गुन्हा नोंद करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रानी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!