MB NEWS-गजराज गणेश मंडळ आयोजित रक्तदान शिबिरात ५५ दात्यांचे रक्तदान !*

 *गजराज गणेश मंडळ आयोजित रक्तदान शिबिरात ५५ दात्यांचे रक्तदान !*


🕳️ _महिला रक्तदात्यांचा हिरिरीने सहभाग; अनेेकांनी स्वयंस्फूर्त केलं रक्तदान_


परळी वैजनाथ/ प्रतिनिधी......

      गेल्या ५५ वर्षांपासून कार्यरत व सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या गजराज गणेश मंडळ , पद्मावती गल्ली यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात ५५ दात्यांचे रक्तदान केले.विशेष म्हणजे या शिबिरात महिला रक्तदात्यांचा हिरिरीने सहभाग दिसुन आला तसेच अनेेकांनी स्वयंस्फूर्त  रक्तदान केले.


सामाजिक बांधिलकी जपणारे गजराज गणेश मंडळ , पद्मावती गल्ली यांचे हे ५५ वे वर्ष आहे या निमित्त दि.४/०९/२०२२ रोजी  रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत या सामाजिक कार्यात हिरिरीने पुढाकार घेतला.


        मान्यवरांच्या उपस्थितीत शिबीराचे उद्घाटन करण्यात आले.या शिबिरात उत्साहात रक्तदात्यांनी रक्तदान केले.रक्तदान शिबिरात ५५ दात्यांचे रक्तदान केले.विशेष म्हणजे या शिबिरात महिला रक्तदात्यांचा हिरिरीने सहभाग दिसुन आला . या शिबिराच्या यशस्वीते साठी गजराज गणेश मंडळ पदाधिकारी,सदस्य यांनी परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !