MB NEWS-बोधेगाव सेवा सोसायटीच्या विजयी संचालकांचा पंकजाताई मुंडे, खा. डाॅ. प्रितमताई मुंडेंनी केला सत्कार

 बोधेगाव सेवा सोसायटीच्या विजयी संचालकांचा पंकजाताई मुंडे, खा. डाॅ. प्रितमताई मुंडेंनी केला सत्कार



जय किसान विकास पॅनलने मारली बाजी ;१३ पैकी ७ संचालक विजयी

परळी  । दिनांक ०५।

   तालुक्यातील बोधेगाव सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखालील जय किसान विकास पॅनलने दणदणीत विजय मिळविला आहे.   पॅनलच्या  १३ पैकी ०७ उमेदवारांनी बाजी मारत विजय खेचून आणला. विजयी उमेदवारांचा पंकजाताई मुंडे व खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी आज सत्कार करून अभिनंदन केले आहे. 


  बोधेगाव, कावळ्याची वाडी व सोनहिवरा या तीन गावची सोसायटी असलेल्या या सेवा सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळाच्या १३  जागांसाठी नुकतीच निवडणूक झाली. पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली जय किसान पॅनलने राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित पॅनलचा पराभव करत ७ जागांवर दणदणीत विजय मिळवला.  या निवडणुकीत पॅनलचे विजयी झालेले उमेदवार पुढीलप्रमाणे - रूस्तुम गडदे, अन्नपूर्णा थिटे, सर्जेराव शिंदे, कौशल्याबाई मकर, शारदाबाई शिंदे, श्रीमंत रूपनर, बालासाहेब शेळके


 पॅनलच्या विजयासाठी  रेशीमनाना कावळे, विनायक गडदे, बळीराम गडदे, रामलिंग गडदे, छत्रपती कावळे, आत्माराम नागरगोजे,  विठ्ठल मुंडे,  केशव खडके, मोतीराम गडदे, अंकुश गडदे, मुरलीधर गडदे  आदींसह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. सर्व विजयी उमेदवारांचा आज पंकजाताई मुंडे यांनी यशःश्री निवासस्थानी सत्कार करून अभिनंदन केले. यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष सतीश मुंडे, जि.प. सदस्य प्रदीप मुंडे आदी उपस्थित होते.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !