इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS-सौदागर कांदे यांना बीड जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान5

 सौदागर कांदे यांना बीड जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

परळी (प्रतिनिधी.  )  परळी तालुक्यातील दगडवाडी येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक सौदागर आबाजी कांदे यांना 5 सप्टेंबर रोजी बीड येथे झालेल्या भव्य कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत बीड जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार 2022 प्रदान करण्यात आला.

      सौदागर कांदे हे नाविन्यपूर्ण आणि उपक्रमशील शिक्षक म्हणून परळी तालुक्यात परिचित आहेत. एक विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणूनही त्यांची ख्याती आहे. त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक तसेच राष्ट्रीय कार्याची बीड जिल्हा परिषदेने दखल घेऊन बीड जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार 2022 साठी त्यांची निवड केली होती.

     5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाच्या निमित्ताने बीड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात भव्य पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांच्या हस्ते सौदागर कांदे यांचा सपत्नीक आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, बीड जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी सारुक ,वरिष्ठ अधिकारी जटाळे, कुलकर्णी शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

     सौदागर कांदे यांना यापूर्वी विविध सामाजिक संघटना, सामाजिक संस्था, वर्तमानपत्रांच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवलेले आहे. त्यांना यापूर्वी आठ पुरस्कार मिळालेले आहेत. बीड जिल्हा परिषदेचा मिळालेला हा नववा पुरस्कार आहे. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे. बीड जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्याला बीड जिल्ह्यातील शिक्षक वर्ग, शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या