इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

अतिशय संताजनक घटना

 परळीत आणखी 'एक नकोशी': तीन ते चार दिवसाचे नवजात स्त्री अर्भक सापडले 


परळी वैजनाथ, प्रतिनिधी- परळीत गेल्या चार दिवसांपूर्वीच सहा महिन्याची मुलगी एका पिशवीत बांधून फेकून दिल्याची घटना ताजी असतानाच आज रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास नवजात तीन ते चार दिवस वयोमान असलेली मुलगी बेवारस अवस्थेत सापडली आहे. या संतापजनक घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

       परळी शहरापासून जवळच असलेल्या नंदागौळ रस्त्यावर बेवारस अवस्थेत नवजात अर्भक फेकून दिले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून घटनास्थळी पोलीस दाखल झाले. या बेवारस अर्भकास उपजिल्हा रुग्णालय परळी येथे आणण्यात आले. स्त्री जातीचे हे अर्भक असून चार ते पाच दिवसाचे वय असावे असा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. दरम्यान चारच दिवसांपूर्वी अशाच प्रकारची एक घटना परळीच्या मालेवाडी  रस्त्यावर घडली होती. पुन्हा त्याच घटनेची पुनरावृत्ती झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Click:● *दुर्दैवी नकोशी : सहा महिन्यांच्या चिमुकलीस पिशवीत बांधून रस्त्यावर फेकले*

     दरम्यान, या घटनेची माहिती कळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. श्री झांबरे व त्यांचे सहकारी पोलीस कर्मचारी यांनी तात्काळ या नवजात अर्भकास उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे या बाळावर उपजिल्हा रुग्णालय परळी येथे सध्या उपचार सुरू आहेत. घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!