युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

ऐन निवडणूक काळात प्रशासन ॲक्शन मोडवर

मोठी बातमी: परळी तालुक्यात पुन्हा गांजाची लागवड उघड: प्रशासनाकडून जप्तीची कारवाई 

परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

        परळी तालुक्यातील काही भागात गांजाची लागवड होण्याच्या घटनेने काही वर्षांपुर्वी खळबळ उडून दिलेली होती. एकेकाळी संपूर्ण देशात परळीची गांजाची शेती चर्चेत आली होती. त्यानंतर आता ऐन निवडणूक काळात महसूल व पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई करत परळी तालुक्यातीलच नागपिंपरी शिवारात गांजाची लागवड पुन्हा उघड केली असून या ठिकाणी जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.

       मौ नागपिंपरी ता परळी वै जि बीड येथे गांजा जप्ती कारवाई करण्यात आली.अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशन चे पीआय पडवळ ,एपीआय खोडेवाड, दिंद्रुड पो स्टे,बी. एल .रुपनर नायब तहसीलदार, तलाठी मंडळ अधिकारी व ईतर 25-30 पोलीस कर्मचारी यांची संयुक्त कारवाई करत गांजा जप्तीची कारवाई केली आहे.  20किलो 770ग्राम एवढा ओला व सुका गांजा जप्त करण्यात आला आहे.नागपिंपरी यथे गोपनीय माहितीवरुन आरोपी विश्वास नामदेव बड़े वय ६० वर्ष याने त्याचे शेतातिल कपासी व तुरीमध्ये गांजाची ३२ झाड़े लावलेले मिळून आली. त्याचे वजन २१ किलो असुन किमत ४१७४०० रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.पुढील तपास अंबाजोगाई ग्रामीण स.पो.नि पडवळ हे करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या