इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

शासन निर्णयानुसार परिचर्या संवर्गातील कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळावी यासाठी अंबाजोगाई स्वा रा ती च्या परिचरिकांचे काम बंद आंदोलन

अंबाजोगाई (वसुदेव शिंदे):-  महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून दि ३१.१२.२०२४ रोजी सन २०२४-२०२५ निवड सूची वर्षात पदोन्नती कार्यवाही जलद गतीने करण्याबाबत परिपत्रके काढले आहे. त्यानुसार मुख्यमंत्री महोदयांनी १०० दिवसाच्या कार्यक्रमात सर्व राज्य शासकीय अधिकारी/कर्मचारी यांची पदोन्नतीची कार्यवाही जलद गतीने करण्याबाबत निर्देश दिले आहेत.परंतु वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच सार्वजनिक आरोग्य विभाग यांचे सेवा प्रवेश नियम मंत्रालय स्तरावर प्रलंबित असल्या कारणामुळे परिचर्या संवर्गातील सर्वंकष पदांची पदोन्नती मागील अनेक वर्षांपासून रखडलेली आहे.या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी दि २० रोजी काम बंद आंदोलन पुकारण्यात आले होते. या काम बंद आंदोलनात स्वा रा ती चे सर्व परिचारक तथा परिचारिका सहभागी झाले होते.      

            पाठ्यनिर्देशिका तसेच विभागीय परिसेविका, सार्वजनिक आरोग्य निर्देशिका, सहाय्यक अधिसेविका, अधिसेविका या पदांची देखील पदोत्रती रखडलेली आहे.

पदोन्नती या सेवाजेष्ठतेच्या आधारेच करावी अशी संघटनेची आग्रही भूमिका आहे.संघटनेतर्फे अनेक वर्षांपासून या पदाच्या पदोन्नतीसाठी पत्रव्यवहार तसाच बैठकीद्वारे चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयन केलेला असूनही सदर पदोन्नत्या प्रलंबितच आहेत. त्यामुळे परिचर्या संवर्गामध्ये संतप्त भावना निर्माण झालेल्या आहेत. अखेर परिचारिकांना न्याय देण्यासाठी आंदोलनात्मक पवित्रा घेण्यात आला असून दि. २०.०२.२०२५ रोजी एक दिवसाचे काम बंद आंदोलन पुकारण्यात आले होते.परिचर्या संवर्गाच्या सर्वंकष पदोन्नती ही महत्त्वाची मागणी आहेच तसेच परिचारिकांना मिळणारे भत्ते विशेषतः परिचर्या भत्ता, ग्रामीण रुग्णालयातील परिसेविका पद पुनर्जीवित करणे, बंधपत्रित परिचारिकांचा सेवा कालावधी नियमित करणे, बक्षी समिती खंड-२ मध्ये परिचर्या संवर्गावर झालेला अन्याय दूर करणे, परिविक्षा कालावधीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेमधून अधिपरिचारिका पद वगळावे या आणि इतर  देखील अनेक मागण्या आहेत. परीचार्यांनी पुकारलेल्या एक दिवसीय काम बंद आंदोलनाची दखल शासनाने न घेतल्यास यानंतर बेमुदत संपाचा आंदोलनात्मक पवित्रा घेण्यात येईल अशी भावना या आंदोलन प्रसंगी परीचारकांनी व्यक्त केली आहे. या काम बंद आंदोलनात महाराष्ट्र गव्हर्मेंट नर्सिंग फेडरेशन संलग्न परिचारिका सेवा संघ अंबाजोगाईच्या अध्यक्षा श्रीमती चित्ररेखा बांगर सचिव श्रीमती रागिनी पवार कार्याध्यक्ष मंगेश सुरवसे उपाध्यक्ष  राम फड यांच्यासह संघटनेचे इतर पदाधिकारी श्रीमती आशा माने अशोक मोराळे ,मनोज जरांगे, नीता घोडके ,वर्षा ठाकूर यांच्यासह सर्वांनी मिळून हे आंदोलन यशस्वीपणे पार पाडले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या