विधानपरिषदेसाठी उमेदवारी कोणाला?

इमेज
  स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषदेसाठी परळीतूनही उमेदवारी? माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख इच्छुक; कार्यकर्त्यांकडून उमेदवारीची जोरदार मागणी परळी | प्रतिनिधी    धाराशिव-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परळीचे माजी नगराध्यक्ष दीपक नाना देशमुख यांच्या नावाची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सक्रिय सदस्य असलेल्या दीपक देशमुख यांनी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जही विकत घेतल्याची माहिती समोर आली असून पक्षाकडे उमेदवारीची मागणी देखील करण्यात आली आहे.    धाराशिव-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मोठा जनसंपर्क, विविध पदाधिकाऱ्यांशी असलेले निकटचे संबंध आणि कार्यकर्त्यांमधील मजबूत पकड यामुळे दीपक देशमुख यांचे नाव चर्चेत आले आहे. परळी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष कारकीर्दीत त्यांनी विविध विकासकामांवर भर दिला होता. त्यामुळे बीड, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रतिनिधींमध्ये त्यांचा चांगला संपर्क  असल्याचे मानले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून राजक...

 स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे घवघवीत यश;40 विद्यार्थ्यांची यशाला गवसणी





परळी / प्रतिनिधी .....

     महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता 8 वर्गाच्या राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक ( एनएमएमएस ) परीक्षेत महाराष्ट्र शिक्षण संस्था मोहा संचलित चार शाळेतील 40 विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण होत घवघवीत यश संपादन केले.

     ग्रामीण भागात गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी संस्था असलेल्या महाराष्ट्र शिक्षण संस्था मोहा संचलित महाराष्ट्र विद्यालय मोहा ता-परळी येथील 12, आसुबाई विद्यालय मांडेखेल येथील 9, सांडेश्वर विद्यालय चनई ता-अंबाजोगाई येथील 8 तर गोदावरी विद्यालय मंजरथ ता-माजलगाव येथील 11 असे 40 विद्यार्थ्यांनी या राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केले. महाराष्ट्र शिक्षण संस्था सातत्याने विद्यार्थी गुणवत्तेबाबत प्रयत्नशील राहिलेली असून स्पर्धा परिक्षबाबत जाणीवपूर्वक काम करत असते. राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेतील यश हे या कामाची फलश्रुती होय. या परीक्षेत पात्र होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी 12 हजार रुपये असे चार वर्षे 48 हजार रुपये शिष्यवृत्ती मिळत असते. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे सचिव व सर्व संचालक मंडळाने चार ही शाळेतील यशस्वी विद्यार्थी, त्याचे मार्गदर्शक शिक्षक व शालेय प्रशासनाचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या