पोस्ट्स

ऑगस्ट २३, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
इमेज
  कला व वाणिज्य महिला महाविद्यालयाचे एक दिवसीय रा से यो , शिबीर उत्साहात   अंबाजोगाई : येथील कला व वाणिज्य महिला महाविद्यालय चा राष्ट्रीय सेवा योजना विभाग अंतर्गत मौजे श्रीपत रायवाडी येथे एक दिवसीय शिबिर 25 ऑगस्ट रोजी उत्कृष्टरित्या संपन्न झाले.        या शिबिरात गावातील शेतकरी पुरुष व महिला साठी उद्बोधन कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ कृषी विद्यापीठ डॉ. अरुण गुट्टे यांनी कमी पर्जन्यमानात सोयाबीन पिकाची घ्यावयाची काळजी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले तर तालुका कृषी अधिकारी श्री विजयकुमार पवार यांनी शेतातील तन नियोजन, एल निनो  चा परिणाम व त्यावरील उपाय या विषयी माहिती दिली. गावातील प्रगतशील शेतकरी श्री राजेंद्र जाधव यांनी जलसंधारण दिनानिमित्त पाणी बचतीचे महत्त्व व त्यावरील उपाय याविषयी माहिती दिली. अध्यक्षीय समारोपात महाविद्यालयाचे प्राचार्य मंचक मोरे यांनी पर्जन्यमानाच्या अंदाजानुसार शेतीचे नियोजन कसे करावे हे सांगितले. या कार्यक्रमास गावातील महिला व पुरुष शेतकरी, गावच्या सरपंच सौ. सुमनताई पवार,रासे...

आ. धनंजय मुंडे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान

इमेज
राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल शहराध्यक्षपदी बाळकृष्ण फुले यांची निवड परळी वैजनाथ : प्रतिनिधी.     राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ओबीसी सेल परळी वै. शहराध्यक्षपदी बाळकृष्ण  अनंतराव फुले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.याबाबतचे नियुक्तीपत्र आज राज्याचे माजी मंत्री तथा परळी विधानसभेचे लोकप्रिय आमदार धनंजय मुंडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या नियुक्ती बद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.       राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा ना. सुनेत्राताई पवार यांच्या नेतृत्वाखाली व माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांच्या आदेशानुसार बाळकृष्ण फुले यांची ही नियुक्ती करण्यात आली आहे. माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वैजनाथ सोळंके, शहराध्यक्ष आयुब खान पठाण, सरचिटणीस अनंत इंगळे आदींसह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे परळी शहर व परिसरातील ओबीसी समाजाच्या विविध  प्रश्नांनवाचा फोडण्यासाठी तसेच राष्ट...

मैदवाडी सेवानगर तांडा येथील प्रकार; तरुणाविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा...

इमेज
अल्पवयीन मुलीला दुचाकीवर जबरदस्तीने नेले; गैरवर्तनासह जीवे मारण्याची धमकी दवाडी सेवानगर तांडा येथील प्रकार; तरुणाविरुद्ध  विविध कलमांतर्गत गुन्हा परळी वैजनाथ, प्रतिनिधी  : परळी तालुक्यातील मैदवाडी सेवानगर तांडा परिसरात अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून घेऊन जात तिच्याशी गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एवढेच नव्हे, तर मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात एका तरुणाविरुद्ध POCSO कायद्यासह भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परळी ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. 28 जानेवारी 2026 रोजी दुपारी सुमारे 2.30 वाजता मैदवाडी सेवानगर तांडा परिसरात हा प्रकार घडला आहे. रवी रामा पवार रा. मैंदवाडी सेवा नगर तांडा येथील आरोपीने अल्पवयीन मुलीला कथितरीत्या बळजबरीने मोटारसायकलवर बसवून नेले. त्यानंतर तिच्याशी लज्जा निर्माण होईल असे गैरवर्तन केले. या घटनेनंतर आरोपीने संबंधित मुलगी तसेच तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी म...

गृह, वन, नगरविकाससह विविध विभागांत संधी...

इमेज
माजी अग्निवीरांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; विविध विभागांत १००० अधिकसंख्य पदे निर्माण होणार शासकीय, निमशासकीय सेवेत नियुक्तीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन; गृह, वन, नगरविकाससह विविध विभागांत संधी मुंबई : प्रतिनिधी भारतीय सशस्त्र दलातील चार वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या माजी अग्निवीरांना राज्य शासनाच्या विविध शासकीय व निमशासकीय विभागांमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. माजी अग्निवीरांसाठी गट-क संवर्गातील सुमारे १००० अधिकसंख्य पदे निर्माण करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाने २७ ऑगस्ट २०२६ रोजी जारी केला. केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेअंतर्गत सशस्त्र दलात चार वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या अग्निवीरांपैकी नियमानुसार २५ टक्के अग्निवीरांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेतले जाते. उर्वरित माजी अग्निवीरांना त्यांच्या प्रशिक्षणाचा, कौशल्याचा आणि शारीरिक क्षमतेचा उपयोग करून राज्यातील शासकीय व निमशासकीय सेवेत संधी देण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. माजी अग्निवीरांना नियुक्ती देण्...

सर्व स्तरातून अभिनंदन.........!!!!

इमेज
  कमी कालावधीत उत्कृष्ट  काम : नाथरा येथील रमेश मुंडे यांचा रेल्वे सेवेतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल सन्मान परळी वैजनाथ : प्रतिनिधी          परळी वैजनाथ तालुक्यातील नाथरा येथील रहिवासी रमेश जगन्नाथ मुंडे यांनी सेंट्रल रेल्वेच्या सोलापूर विभागात मेकॅनिकल विभागात कार्यरत असताना अल्पावधीत केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत त्यांचा १५ ऑगस्ट रोजी विशेष सन्मान करण्यात आला. रेल्वे सेवेत कर्तव्यनिष्ठा, समर्पण आणि उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.              रमेश मुंडे हे सेंट्रल रेल्वेच्या सोलापूर डिव्हिजनमध्ये मेकॅनिकल विभागात कार्यरत आहेत. आपल्या कामातील तत्परता, जबाबदारीची जाणीव आणि समर्पित वृत्तीच्या माध्यमातून त्यांनी कमी कालावधीत वरिष्ठांचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या या कामगिरीची दखल घेत स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाचे औचित्य साधून त्यांचा गौरव करण्यात आला. नाथरा या ग्रामीण भागातून पुढे येत रेल्वेसारख्या महत्त्वाच्या सेवाक्षेत्रात कार्यरत राहून...

परळी ग्रामीण पोलिसांचा छापा....धडक कारवाई...

इमेज
  शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये ‘तिरट’चा डाव; २० जणांवर कारवाई परळी ग्रामीण पोलिसांचा  छापा; ३७ लाख ३४ हजारांचा मुद्देमाल जप्त परळी वैजनाथ : प्रतिनिधी       शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये गुपचूप सुरू असलेल्या ‘तिरट’ जुगाराच्या अड्ड्यावर परळी ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत जुगार खेळणाऱ्या १८ जणांसह जुगार चालविणारा आणि जुगारासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या अशा एकूण २० जणांवर कारवाई करण्यात आली. पोलिसांनी रोख रक्कम, विविध कंपन्यांचे मोबाईल, दुचाकी व चारचाकी वाहने असा एकूण ३७ लाख ३४ हजार २७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. परळी-अंबाजोगाई रस्त्यालगत कन्हेरवाडी शिवारातील शेतातील एका पत्र्याच्या शेडमध्ये ‘तिरट’ जुगार सुरू असल्याची माहिती परळी ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार २७ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे ३.४० वाजता पोलिसांनी तेथे छापा टाकला. यावेळी काही जण पत्त्यांवर पैसे लावून जुगार खेळत असल्याचे, तर काही जणांकडून जुगार खेळविला जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. १८ जुगाऱ्यांसह दोघांवरही कारवाई या प्रकरणात शेख निजाम फकिर अहमद, बालाजी नाथराव ...
इमेज
  नादब्रह्म संगीत विद्यालय संचालक वीरेंद्र नरवणे यांचे निधन परळी :  येथील गांधी मार्केट परिसरातील नादब्रह्म संगीत विद्यालय परळीचे संचालक वीरेंद्र (दिपक) गणपतप्पा नरवणे यांचे अल्प आजाराने २७ ऑगस्ट रोजी गुरुवारी सकाळी निधन झाले. सायंकाळी त्यांच्या पार्थिव देहावर येथील वीरशैव लिंगायत स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत्यू समयी त्यांचे वय ६३ वर्ष होते. त्यांच्या पश्चात आई,पत्नी,एक मुलगा, ६ बहीणी, एक भाऊ असा परिवार आहे. आर्यन नरवणे यांचे ते वडील होते तर येथील श्री सुरेश चौधरी यांचे ते भाचे होते.

दुःखद वार्ता: भावपूर्ण श्रद्धांजली!!!

इमेज
  माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांच्या मातोश्री रंजनाबाई देशमुख यांचे निधन परळी वैजनाथ : परळीचे माजी नगराध्यक्ष दीपक रंगनाथ देशमुख यांच्या मातोश्री श्रीमती रंजनाबाई रंगनाथराव देशमुख यांचे 87 वर्षी  आज, गुरुवार दि. २७ ऑगस्ट २०२६ रोजी  निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुले, दोन मुली, सुना,नातवंडे असा भरगच्च परिवार आहे. निधनाने देशमुख कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, शहरात हळहळ व्यक्त होत आहे. श्रीमती रंजनाबाई रंगनाथराव देशमुख या प्रेमळ, मनमिळावू व धार्मिक वृत्तीच्या होत्या. त्यांच्या निधनाने देशमुख परिवाराची मोठी हानी झाली आहे. त्यांच्यावर शुक्रवार, दि. २८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९ वाजता परळी वैजनाथ येथील देशमुख स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. देशमुख कुटुंबीयांच्या दुःखात एम बी न्यूज परिवार सहभागी आहे.
इमेज
संतभूमी रक्षणासाठी शिवसेनेचे शिष्टमंडळ भामचंद्र डोंगरावर पुणे : प्रतिनिधी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या साक्षात्काराची तपोभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातील भामचंद्र डोंगराच्या संरक्षणासाठी शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मातोश्रीच्या सूचनेनुसार शिवसेनेचे आमदार रवींद्र मिर्लेकर यांच्यासह पुणे जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने बुधवारी (दि. २६) भामचंद्र डोंगराची प्रत्यक्ष पाहणी केली. भंडारा, भामचंद्र आणि घोराडेश्वर हे डोंगर संत तुकाराम महाराजांच्या ध्यान, चिंतन व साधनेशी जोडलेले असून, या परिसराला प्राचीन ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसाही लाभला आहे. या डोंगर परिसरात बौद्ध, शैव व जैन परंपरेशी संबंधित प्राचीन लेणी असल्याचे सांगण्यात येते. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून औद्योगिक प्रकल्प, अतिक्रमण आणि कथित बेकायदेशीर उत्खननामुळे या परिसराच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाल्याचा आरोप संतभूमी संरक्षक संघर्ष समितीने केला आहे. या परिसराचे महत्त्व लक्षात घेऊन पुरातत्त्व विभागाने सन २०११ मध्ये भंडारा, भामचंद्र व घोराडेश्वर डोंगर परिसराचा राज्य संरक्षित स्मारकाच्...

भाजप प्रदेश प्रवक्ता राम कुलकर्णी यांचा विशेष लेख>>>≥>

इमेज
  राखीचा धागा : बहिणीच्या मायेची आणि भावाच्या कर्तव्याची आठवण रक्षाबंधन हा केवळ बहिणीने भावाच्या मनगटावर राखी बांधण्याचा सण नाही; तो रक्ताच्या नात्यातील प्रेम, विश्वास, जिव्हाळा आणि परस्परांच्या रक्षणाची भावना दृढ करणारा संस्कृतीचा उत्सव आहे. हजारो वर्षांच्या भारतीय परंपरेतून आलेल्या या सणामागे केवळ एक धागा नसतो, तर त्या धाग्याला जोडलेल्या असतात असंख्य आठवणी, बालपण, माया आणि आयुष्यभराची निःस्वार्थ साथ. बहिणीच्या हाताने भावाच्या मनगटावर बांधली जाणारी राखी म्हणजे भावाच्या सुखासाठी, आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी केलेली मनापासूनची प्रार्थना असते. त्याच वेळी भावानेही आपल्या बहिणीच्या सुख-दुःखात खंबीरपणे तिच्या पाठीशी उभे राहावे, संकटाच्या वेळी धावून जावे, ही त्या राखीची खरी भावना आहे. आपल्या संस्कृतीने स्त्रीचा सन्मान आणि तिच्या रक्षणाची जबाबदारी ही केवळ कायद्याची बाब न मानता ती कुटुंबाच्या संस्कारांचा भाग मानली आहे. संकटसमयी बहिणीसाठी भाऊ धावून जाणे, तिच्या सुख-दुःखाची विचारपूस करणे, तिच्या संसारातील अडचणीच्या वेळी आधार देणे, हे भावाच्या कर्तव्याचेच एक रूप आहे. बहिणीला महागडी भेट नक...

कार्यकारिणीत समाजातील सर्व घटकांना प्रतिनिधित्व देण्याचा योग्य प्रयत्न

इमेज
ना. पंकजा मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चाची दमदार टीम जाहीर कार्यकारिणीत समाजातील सर्व घटकांना प्रतिनिधित्व देण्याचा योग्य प्रयत्न बीड दि. २७ --- राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संजय आंधळे यांनी जिल्हा युवा मोर्चाची कार्यकारिणी घोषित केली आहे. युवा मोर्चाच्या या नव्या दमदार टीममध्ये समाजातील सर्व जाती धर्माच्या युवकांना प्राधान्य देऊन एक चांगला संदेश देण्यात आला आहे.     ना. पंकजाताई मुंडे यांनी जिल्ह्यात भाजपची संघटनात्मक फळी मजबूत करण्याच्या दृष्टीने युवा मोर्चाच्या माध्यमातून युवकांना न्याय दिला आहे. नव्या कार्यकारिणीत समाजातील ओबीसी, मायक्रो ओबीसी, मराठा, मुस्लिम, मागासवर्गीय आदी विविध जाती धर्माला प्रतिनिधित्व देण्याचा योग्य प्रयत्न करण्यात आला आहे. यात ७ सरचिटणीस, ११ उपाध्यक्ष, १५ सचिव, १० सदस्य आणि एक कोषाध्यक्ष यांचा समावेश आहे. *प्रत्येकांना न्याय देण्याचा प्रयत्न करू - ना. पंकजाताई* -------- संघटनेत असंख्य कार्यकर्ते असताना प्रत्येकांना...
इमेज
सकाळ, दुपार की संध्याकाळ? राखी बांधण्यासाठी सर्वात शुभ वेळ कोणती? भाऊ-बहिणीच्या नात्याचे प्रतीक असलेला सण म्हणजे रक्षाबंधन. दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो. एकमेकांशी भांडणाऱ्या पण एकमेकांवर प्रचंड जीव असणाऱ्या भावंडांना प्रेम व्यक्त करण्याची संधी हा दिवस देतो. रक्षाबंधन या शब्दाचा अर्थ सुद्धा या नात्याइतकाच सहज व सोपा आहे. भावंडांनी एकमेकांची कठीण काळात रक्षा करायची आठवण करून देणारे एक बंधन यादिवशी राखीच्या रूपात हातावर बांधले जाते. पारंपरिक रीतींनुसार भावाने बहिणीचे रक्षण करावे यासाठी बहीण भावाच्या हातावर राखी बांधते पण कालानुरूप आता अनेक संकल्पना बदलत आहेत, त्यामुळेच भावंडांनी एकमेकांच्या पाठीशी उभं राहण्याचा हा दिवस आहे असे म्हणता येईल. यंदा २८ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा हे सण साजरे केले जाणार आहेत. रक्षाबंधनच्या दिवशी अनेकांना पडणारा प्रश्न म्हणजे, राखी बांधण्याची शुभ वेळ कोणती? सकाळ, दुपार की संध्याकाळ? आणि राखी बांधण्याची शुभ वेळ चुकली तर काय करावे? कोणत्या वेळेत राखी बांधावी? सर्व माहिती जाणून घ्या.. सकाळ, दुपार की संध्याकाळ? राखी बांधण्य...
इमेज
नेपाळमध्ये पूरस्थिती; बीड जिल्ह्यातील पर्यटकांनी प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन बीड, दि. २६ ऑगस्ट २०२६ : नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर विविध देशांतील पर्यटक व नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील कोणतेही पर्यटक नेपाळमध्ये पूरस्थितीमुळे अडकले असतील किंवा त्यांचा आपल्या कुटुंबीयांशी संपर्क होत नसेल, तर संबंधित पर्यटकांनी अथवा त्यांच्या नातेवाईकांनी तात्काळ जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. नेपाळमध्ये असलेल्या पर्यटकांची माहिती प्रशासनाला देताना संबंधितांनी सोबत दिलेल्या ऑनलाईन लिंकवर आवश्यक माहिती भरावी, जेणेकरून प्रशासनाला संबंधित व्यक्तींची माहिती संकलित करून आवश्यक ती मदत व कार्यवाही करणे शक्य होईल. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी खालील क्रमांकांवर संपर्क साधावा : टोल फ्री : १०७७ जिल्हा नियंत्रण कक्ष, बीड : ०२४४२-२९९२९९ नेपाळमधील पूरस्थिती लक्षा...
इमेज
प्रामाणिकपणाची ‘गौरव’ गाथा! : ‘सापडले ते आपले नाही’ प्रेरक दृढ भावना एटीएम मध्ये सापडली रक्कम; गौरव इंगळेंनी स्वतः पोलीसात जावून केली स्वाधीन परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :         आजच्या धावपळीच्या आणि स्वार्थी प्रवृत्तीच्या काळात माणुसकी, प्रामाणिकपणा आणि सामाजिक बांधिलकीची जपणूक करणाऱ्या घटना निश्चितच प्रेरणादायी ठरतात. परळी शहरातील गौरव  इंगळे यांनी याचा प्रत्यय देत एटीएममध्ये सापडलेली ₹३ हजारांची रक्कम स्वतःकडे न ठेवता पोलिसांच्या स्वाधीन केली.प्रश्न रक्कम किती होती हा नाही तर सजग व प्रामाणिकपणा याचे हे उदाहरण ठरले आहे.         आयडीबीआय बॅकेच्या बाजुला असलेल्या एटीएममध्ये गौरव इंगळे यांना तीन हजार रुपयांची रक्कम सापडली. ही रक्कम आपली नसल्याचे लक्षात येताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता ती संभाजीनगर पोलीस ठाण्यात जाऊन ती जमा केली. आजच्या काळात सापडलेली वस्तू किंवा रक्कम स्वतःकडे ठेवण्याचा मोह अनेकांना होऊ शकतो. मात्र, ‘सापडले ते आपले नाही’ ही जाणीव मनात ठेवून गौरव इंगळे यांनी दाखविलेला प्रामाणिकपणा समाजासाठी...

ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ दर्शनासोबत अन्नसेवेचा पवित्र संगम...

इमेज
लोकोपयोगी उपक्रम : ‘श्री सदाशिव सेवा अन्नछत्र’मध्ये दररोज हजारो भाविकांना मोफत भोजनप्रसादाचा लाभ परळी वैजनाथ/संतोष जुजगर  पंचम ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथाच्या दर्शनासाठी देशाच्या कानाकोपर्‍यातून दररोज हजारो भाविक परळी वैजनाथ येथे दाखल होत आहेत. प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतल्यानंतर भाविकांना प्रेमाने आणि सन्मानाने भोजनप्रसाद मिळावा, या उदात्त भावनेतून श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टने सुरू केलेले ‘श्री सदाशिव सेवा अन्नछत्र’ हे भाविकांसाठी मोठा आधार ठरत असून, दररोज हजारो यात्रेकरू या मोफत भोजनप्रसादाचा लाभ घेत आहेत. गेल्यावर्षी सुरू करण्यात आलेल्या या अन्नछत्र उपक्रमाला भाविकांचा दिवसेंदिवस वाढता प्रतिसाद मिळत आहे. सध्या पवित्र श्रावण महिना सुरू असून दररोज श्रीं च्या दर्शनासाठी दूरवरून येणार्‍या यात्रेकरूंना कोणतीही गैरसोय होऊ नये, तसेच त्यांना सात्त्विक, स्वच्छ आणि पौष्टिक भोजन उपलब्ध व्हावे, या उद्देशाने ही सेवा अखंडपणे सुरू असल्याचे श्री वैद्यनाथ देवल कमिटीचे सचिव श्री राजेश देशमुख यांनी सांगितले. अन्नछत्रामध्ये दररोज सकाळी 11 ते दुपारी 1 आणि सायंकाळी 6 ते रात्री 8 या वेळेत भोजनप्रस...
इमेज
परळी वैजनाथ शहरातील जलकुंभांच्या दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर सुरू नगराध्यक्षा, पाणीपुरवठा सभापती व मुख्याधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष पाहणी परळी वैजनाथ : प्रतिनिधी...      शहरातील नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि सुरळीत पाणीपुरवठा मिळावा, यासाठी परळी नगरपरिषद मार्फत शहरातील जलकुंभांच्या देखभाल व दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत. सुरू करण्यात आलेल्या या कामांची आज नगराध्यक्षा सौ.पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी, पाणीपुरवठा सभापती सौ. जयश्री रविंद्र गित्ते, मुख्याधिकारी श्री. पी. एन. निगळ यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.     नगरपरिषदेच्या वतीने शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था सुरळीत ठेवण्याबरोबरच नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित पाणी उपलब्ध करून देण्याला नगरपरिषदेने प्राधान्य दिले आहे. त्यामुळे जलकुंभांच्या दुरुस्ती व सुधारणेची कामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.जल कुंभांची परिपूर्ण दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत. यामध्ये जलकुंभामधील गाळ काढणे,आतून प्लास्टर, कलर ,नविन वॉल, फॅब्रिकेशनच्या शिडी भेगा भरणे व काँक्रीट दुरुस्ती,गं...

२७२ किलो क्षमतेची लिफ्ट....

इमेज
गैरसोय दूर ; सुविधा परिपूर्ण : परळी वैजनाथ नगरपरिषद मुख्यालयात अत्याधुनिक नवी लिफ्ट कार्यान्वित ! नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांच्या हस्ते श्रीफळ फोडून शुभारंभ परळी वैजनाथ : प्रतिनिधी....       परळी वैजनाथ नगरपरिषद मुख्यालयाच्या इमारतीमध्ये अधिकारी, कर्मचारी तसेच विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी अत्याधुनिक लिफ्टची सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे. या नव्या लिफ्टमुळे मुख्यालयातील विविध मजल्यांवर ये-जा करणे अधिक सुलभ होणार असून, नागरिकांची होणारी गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे.     नगरपरिषद मुख्यालयात बसविण्यात आलेल्या नव्या अत्याधुनिक लिफ्टचा औपचारिक शुभारंभ नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांच्या शुभहस्ते श्रीफळ फोडून करण्यात आला. यावेळी नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.परळी नगरपरिषद मुख्यालयात विविध आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने लिफ्टची सुविधा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. लिफ्टमुळे वेळेची बचत होण्याबरोबरच मुख्यालयातील कार्यालयीन कामकाजासाठी येणाऱ्या नागरिकांना अधिक सुलभ व सोयीस्कर सुवि...