विधानपरिषदेसाठी उमेदवारी कोणाला?

इमेज
  स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषदेसाठी परळीतूनही उमेदवारी? माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख इच्छुक; कार्यकर्त्यांकडून उमेदवारीची जोरदार मागणी परळी | प्रतिनिधी    धाराशिव-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परळीचे माजी नगराध्यक्ष दीपक नाना देशमुख यांच्या नावाची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सक्रिय सदस्य असलेल्या दीपक देशमुख यांनी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जही विकत घेतल्याची माहिती समोर आली असून पक्षाकडे उमेदवारीची मागणी देखील करण्यात आली आहे.    धाराशिव-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मोठा जनसंपर्क, विविध पदाधिकाऱ्यांशी असलेले निकटचे संबंध आणि कार्यकर्त्यांमधील मजबूत पकड यामुळे दीपक देशमुख यांचे नाव चर्चेत आले आहे. परळी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष कारकीर्दीत त्यांनी विविध विकासकामांवर भर दिला होता. त्यामुळे बीड, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रतिनिधींमध्ये त्यांचा चांगला संपर्क  असल्याचे मानले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून राजक...

अव्वाच्या सव्वा विज बिलामुळे ग्राहक संतप्त; वीज वितरण कार्यालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह



परळी : वापरापेक्षा अव्वाच्या सव्वा विज बिल येत असल्याने परळीतील वीज ग्राहक संतप्त झाले असून अन्यायकारक बिलांविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे. विज बिल दुरुस्ती वेळेवर होत नसल्याने आणि कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून समाधानकारक माहिती मिळत नसल्याने नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत असल्याच्या गंभीर तक्रारी पुढे आल्या आहेत. सोमवारी अतिरिक्त कार्यकारी अभियंता, वीज वितरण कार्यालयात बिल प्रत काढणे व दुरुस्ती करून घेण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी झाली होती. मात्र. अतिरिक्त कार्यकारी अभियंता व शहर शाखा अभियंता हे कार्यालयीन बैठकीसाठी बाहेरगावी गेल्याची माहिती देण्यात आली. दरम्यान, वीज वितरण कार्यालयाच्या अंदाधुंद कारभारामुळे ग्राहक वैतागले आहेत. वेळेवर बिल न मिळणे, चुकीचे व जादा रीडिंग दाखवून ग्राहकांची आर्थिक लूट करणे, तसेच दुरुस्तीसाठी आलेल्या ग्राहकांना सौजन्याऐवजी उद्धट वागणूक देणे, अशा तक्रारींमध्ये मोठी वाढ झाली आहे. अनेक वेळा ग्राहक आणि एका कर्मचाऱ्यांमध्ये वादही झाले आहेत. गेल्या आठवड्यात नातेवाईकाच्या बिल दुरुस्तीसाठी कार्यालयात गेलो असता बिल दुरुस्ती वेळेवर झाली नाही, उलट अपमानास्पद वागणूक मिळाली, अशी संतप्त प्रतिक्रिया मोहन चव्हाण यांनी दिली. तर विज बिल रीडिंग संदर्भात तक्रार करण्यासाठी कार्यालयात गेलो असता संबंधित कर्मचारी भेटले नाहीत आणि दुरुस्ती होत नसल्याने नाहक त्रास सहन करावा लागत आहे, अशी तक्रार सुधीर गोस्वामी यांनी केली. एकूणच, वीज वितरण कार्यालयाच्या ढिसाळ कारभारामुळे परळीतील वीज ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून अन्यायकारक बिलांचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी होत आहे. रीडिंग पेक्षा जास्त बिल ज्यांना येत आहेत त्यांनी दुरुस्तीसाठी शाखा अभियंत्याशी संपर्क साधावा व अर्ज करावा असे आवाहन अतिरिक्त कार्यकारी अभियंता वीज वितरण कार्यालय परळी यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या