लॉजमध्ये संशयास्पद मृत्यू
माजलगाव: प्रतिनिधी
माजलगाव शहरातील व्यंकटेश लॉजमधील एका खोलीत तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळून आल्याची घटना २० फेब्रुवारी रोजी उघडकीस आली. प्राथमिक तपासात आत्महत्येची शक्यता व्यक्त करण्यात येत असली तरी नेमके कारण स्पष्ट झालेले नाही.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णा डाके (रा. ता. माजलगाव, जि. बीड) यांनी १५ फेब्रुवारी रोजी व्यंकटेश लॉजमधील खोली क्रमांक २०५ आरक्षित केली होती. दरम्यान, संबंधित खोलीतून दुर्गंधी येत असल्याची बाब लॉज व्यवस्थापनाच्या निदर्शनास आली. २० फेब्रुवारी रोजी खोलीचा दरवाजा आतून बंद असल्याचे आढळले. दरवाजा उघडून पाहणी केली असता संबंधित व्यक्तीचा मृतदेह खोलीत आढळून आला.घटनेची माहिती मिळताच माजलगाव शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून आत्महत्येची शक्यता तपासली जात आहे. शवविच्छेदन अहवालानंतर अधिक माहिती समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा