विधानपरिषदेसाठी उमेदवारी कोणाला?

इमेज
  स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषदेसाठी परळीतूनही उमेदवारी? माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख इच्छुक; कार्यकर्त्यांकडून उमेदवारीची जोरदार मागणी परळी | प्रतिनिधी    धाराशिव-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परळीचे माजी नगराध्यक्ष दीपक नाना देशमुख यांच्या नावाची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सक्रिय सदस्य असलेल्या दीपक देशमुख यांनी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जही विकत घेतल्याची माहिती समोर आली असून पक्षाकडे उमेदवारीची मागणी देखील करण्यात आली आहे.    धाराशिव-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मोठा जनसंपर्क, विविध पदाधिकाऱ्यांशी असलेले निकटचे संबंध आणि कार्यकर्त्यांमधील मजबूत पकड यामुळे दीपक देशमुख यांचे नाव चर्चेत आले आहे. परळी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष कारकीर्दीत त्यांनी विविध विकासकामांवर भर दिला होता. त्यामुळे बीड, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रतिनिधींमध्ये त्यांचा चांगला संपर्क  असल्याचे मानले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून राजक...

 पुत्राच्या स्मृतीसाठी पालकांचे दातृत्व; मंदिरासाठी एक एकर जमीन दान




अंबाजोगाई, प्रतिनिधी...
          अंबाजोगाई तालुक्यातील चंदनवाडी येथील अरूण वसंतराव गित्ते आणि सौ. कौशल्या अरूणराव गित्ते यांनी आपल्या दिवंगत मुलगा तेजस यांच्या स्मृतीप्रित्यर्थ एक एकर जमीन मंदिरासाठी दान देत सामाजिक व धार्मिक आदर्श घालून दिला आहे. या दानातून ‘श्री तेजस्वी महादेव मंदिर’ उभारण्यात येणार असून नुकताच भूमिपूजन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.

स्व. तेजस अरूणराव गित्ते (वय २१) हे पुणे येथे बी.कॉम.चे शिक्षण घेत होते. गतवर्षी महाशिवरात्रीच्या दिवशी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे अकाली निधन झाले. शिवभक्त असलेल्या तेजस यांना महादेवाबद्दल विशेष श्रद्धा होती, अशी माहिती कुटुंबीयांनी दिली. मुलाच्या स्मृती चिरंतन राहाव्यात आणि त्याच्या श्रद्धेला आकार मिळावा या भावनेतून गित्ते दांपत्याने गावालगतची एक एकर जमीन मंदिरासाठी अर्पण करण्याचा निर्णय घेतला.

चंदनवाडी (ता. अंबाजोगाई) येथे नियोजित मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमाला सूर्यभान मुंडे (सभापती, बाजार समिती, परळी वैजनाथ) यांच्यासह ग्रामस्थ व पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते. गावकऱ्यांनी गित्ते कुटुंबीयांच्या निर्णयाचे स्वागत करत त्यांचा सन्मान केला.

      या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड. राजेश्वर चव्हाण यांनी सांगितले की, हे केवळ मंदिराचे भूमिपूजन नसून एका तरुणाच्या श्रद्धेचे आणि कुटुंबाच्या त्यागाचे प्रतीक आहे. मुलाच्या स्मृतीतून समाजोपयोगी कार्य घडवण्याचा निर्णय प्रेरणादायी आहे.

 नियोजित मंदिरामुळे गावाच्या धार्मिक व सामाजिक उपक्रमांना चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. दुःखातून उभारी घेत समाजासाठी सकारात्मक कार्य घडवून आणण्याचा गित्ते कुटुंबीयांचा निर्णय चंदनवाडी परिसरात प्रेरणादायी ठरत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या