ना. पंकजाताई मुंडे यांनी केले पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन
मुंबई दि. ३१ --
राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांनी आज रामटेक निवासस्थानी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना त्यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त अभिवादन केले. माझ्या राजकीय जीवनात अहिल्याबाईंचे योगदान महत्वाचे असून त्यांचे संस्कार व आदर्श माझ्यासाठी प्रेरणादायी आहेत असं त्यांनी म्हटलं आहे.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त आज रामटेक निवासस्थानी ना. पंकजाताई मुंडे यांनी त्यांच्या मूर्तीस पुष्प वाहून त्यांना अभिवादन केले. अभिवादनाचा एक व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. धर्मकार्य, संस्कृतीसंरक्षण, निकोप राजसत्ता आणि शौर्य गाजवणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या प्रत्येकासाठी प्रेरणास्थान आहेत .आपल्या राजकीय वाटचालीतही त्यांचाच आदर्श घेऊन आपण पुढे जात आहोत असे त्यांनी म्हटले आहे.
••••
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा