३ जून..... गोपीनाथ गडावर साधेपणाने कार्यक्रम...
पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजा मुंडे यांचा २ ते ४ जून दरम्यान बीड जिल्हा दौरा
परळी वैजनाथ: प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण, वातावरणीय बदल व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा गोपीनाथ मुंडे यांचा २ जून ते ४ जून २०२६ या कालावधीत बीड जिल्ह्याचा अधिकृत दौरा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या तीन दिवसीय दौऱ्यात विविध शासकीय, सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
मंगळवार, २ जून २०२६ रोजी दुपारी ०२.०० वा.: रामटेक निवासस्थान (मुंबई) येथून वाहनाने समृद्धी महामार्ग मार्गे परळी वैजनाथ, जि. बीडकडे प्रस्थान. ,रात्री ११.०० वा.: परळी येथील 'यश:श्री' निवासस्थानी आगमन व राखीव. बुधवार, ३ जून २०२६ रोजी सकाळी ०९.३० वा.: 'यश:श्री' निवासस्थान येथून गोपीनाथगड (परळी) कडे प्रस्थान., सकाळी १०.०० वा.: लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या स्मृती दिना निमित्त समाधीस्थळाचे दर्शन व अभिवादन., दुपारी ०१.०० वा.: समाधीस्थळावरून वाहनाने 'यश:श्री' निवासस्थानाकडे प्रयाण. दुपारी ०१.१५ वा.: निवासस्थानी आगमन व वेळ राखीव.,गुरुवार, ४ जून २०२६ रोजी सकाळी ११.०० वा.: 'यश:श्री' निवासस्थानावरून श्री क्षेत्र वैद्यनाथ मंदिराकडे प्रयाण व दर्शन., सकाळी ११.३० वा.: दर्शन आटोपून निवासस्थानी आगमन व राखीव. दुपारी ०१.३० वा.: परळी वैजनाथ येथून वाहनाने अंबाजोगाईकडे प्रयाण., दुपारी ०२.०० वा.: अंबाजोगाई येथे आगमन व भाजपा प्रवक्ते श्री. राम कुलकर्णी यांच्या निवासस्थानी भेट व राखीव. दुपारी ०२.४५ वा.: अंबा साखर कारखान्याजवळील चतुरवाडी येथे श्री. बाळासाहेब दोडतले यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट., दुपारी ०३.३० वा.: वाहनाने अंबाजोगाईकडे प्रयाण. सायं. ०४.०० ते ०७.०० वा.: जनसंपर्क कार्यालय, अंबाजोगाई येथे आगमन आणि नागरिकांच्या भेटीगाठींसाठी वेळ राखीव.,संध्या. ०७.१५ वा.: अंबाजोगाई येथून वाहनाने परळी वैजनाथकडे प्रयाण. संध्या. ०७.३५ वा.: 'यश:श्री' निवासस्थानी आगमन व राखीव.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा