पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल....

इमेज
माझ्यासोबत पळून नाही आलीस तर कुटुंबाला जिवंत सोडणार नाही ! १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग व पाठलाग करून धमकी परळी वैजनाथ, प्रतिनिधी...        माझ्यासोबत पळून नाही आलीस तर तुझ्या मामांना, आजी आजोबाला जिवंत सोडणार नाही. तुझे फोटो व्हायरल करील असे म्हणत एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग व पाठलाग करून धमकी दिल्या प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात एका युवकाविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.          पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी कृष्णा बाबुराव शिंदे (रा. बेलांबा ता. परळी) याने एका अल्पवयीन मुलीला मैत्री करण्यासाठी वारंवार त्रास दिला. मुलीने त्यास नकार दिल्यानंतर आरोपीने तिचा पाठलाग करणे सुरू ठेवले. गल्लीमध्ये पीडित मुलगी दूध आणण्यासाठी गेलेली असताना पाठीमागे येऊन त्याने तिला पकडून तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तसेच "तू माझ्याशी बोलत नाहीस" तू माझ्यासोबत पळून नाही आलीस तर तुझे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करील त्याचप्रमाणे तुझ्या मामा व आजी आजो...

"तू मला का बोलत नाहीस" म्हणत तरुणीवर चाकूने सपासप वार करून हल्ला; एकाविरुद्ध खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा

परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
         परळी शहरातील पंचशील नगर परिसरात भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या  एका २३ वर्षीय तरुणीवर चाकूने सपासप वार करून जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली असून या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
       पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळा(निजाम) ता.परंडा जि.धाराशिव येथील मुळ रहिवाशी असणारी पिडित तरुणी परळी वैजनाथ येथील पंचशील नगर परिसरात एका रुमवर राहत होती. शुक्रवारी (दि. ५ जून) रात्री सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास संशयित आरोपी अनंत पाटलोबा गित्ते (रा. मालेवाडी, ता.परळी वैजनाथ) हा  पिडितेच्या घरी गेला. चारित्र्याच्या संशयावरुन यावेळी दोघांमध्ये वाद झाल्यानंतर संशयिताने शिवीगाळ करत तू मला का बोलत नाहीस असे म्हणत तरुणीला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपीने चाकूने तरुणीच्या उजव्या हातावर, पोटावर तसेच डाव्या हाताच्या दंडावर सपासप वार केले.  या हल्ल्यात ही तरुणी गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर जखमी तरुणीचा वैद्यकीय अहवाल (एमएलसी) प्राप्त झाल्यानंतर शनिवारी (दि. ६ जून) दुपारी शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 109, 118(2), 118(1), 115(2) आणि 351(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण हे करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या