पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल....

इमेज
माझ्यासोबत पळून नाही आलीस तर कुटुंबाला जिवंत सोडणार नाही ! १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग व पाठलाग करून धमकी परळी वैजनाथ, प्रतिनिधी...        माझ्यासोबत पळून नाही आलीस तर तुझ्या मामांना, आजी आजोबाला जिवंत सोडणार नाही. तुझे फोटो व्हायरल करील असे म्हणत एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग व पाठलाग करून धमकी दिल्या प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात एका युवकाविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.          पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी कृष्णा बाबुराव शिंदे (रा. बेलांबा ता. परळी) याने एका अल्पवयीन मुलीला मैत्री करण्यासाठी वारंवार त्रास दिला. मुलीने त्यास नकार दिल्यानंतर आरोपीने तिचा पाठलाग करणे सुरू ठेवले. गल्लीमध्ये पीडित मुलगी दूध आणण्यासाठी गेलेली असताना पाठीमागे येऊन त्याने तिला पकडून तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तसेच "तू माझ्याशी बोलत नाहीस" तू माझ्यासोबत पळून नाही आलीस तर तुझे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करील त्याचप्रमाणे तुझ्या मामा व आजी आजो...

खेत बचाव अभियान" आणि "किसान गोष्टी" उपक्रम....

हवामान बदलाच्या आव्हानांवर मात करण्यासाठी हवामान अनुकूल तंत्रज्ञानाचा अवलंब गरजेचा : जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन



परळी वैजनाथ, प्रतिनिधी :
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत तालुका कृषी अधिकारी कार्यालय, परळी वैजनाथ यांच्या वतीने "खेत बचाव अभियान" आणि "किसान गोष्टी" उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेले हवामान अनुकूल तंत्रज्ञान प्रशिक्षण उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमाला बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन प्रमुख उपस्थित होते.

हवामान बदलामुळे कृषी क्षेत्रासमोर निर्माण होत असलेल्या नव्या आव्हानांचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांनी हवामान अनुकूल तंत्रज्ञानाचा अवलंब करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी यावेळी केले. शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, नैसर्गिक उपाययोजना आणि शाश्वत शेती पद्धतींचा स्वीकार करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे आयोजन तालुका कृषी अधिकारी डॉ. अर्चना नागरगोजे यांनी केले होते. कृषी विज्ञान केंद्र, अंबाजोगाई येथील कृषि विस्तार विषय विशेषज्ञ सुहास पंके यांनी प्रास्ताविक करत एल-निनोच्या संभाव्य परिणामांबाबत शेतकऱ्यांना माहिती दिली. कृषी विभागाच्या शिफारशींनुसार नियोजन करण्यासह सरी-वरंबा पद्धतीचा वापर आणि पुरेसा पाऊस झाल्यानंतर कमी कालावधीच्या वाणांची निवड करण्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.

उपकृषी अधिकारी ए. जी. गाडे यांनी एकात्मिक शेती व्यवस्थापन, हुमणी अळी नियंत्रण, सापळा पिके, आंतरपिके, चिकट व प्रकाश सापळ्यांचा वापर याविषयी माहिती दिली. तसेच निंबोळी अर्क व दशपर्णी अर्क निर्मिती, किडींची ओळख आणि आर्थिक नुकसान पातळी लक्षात घेऊन योग्य कीडनियंत्रण उपाययोजना राबविण्याबाबत मार्गदर्शन केले.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे उपविभागीय तंत्रज्ञान समन्वयक शिवप्रसाद येळकर यांनी महाविस्तार एआय ॲपच्या वापराबाबत माहिती देत एनडीकेएसपी प्रकल्पांतर्गत अर्ज प्रक्रिया समजावून सांगितली. सोयाबीन पिकातील खोडमाशी नियंत्रणासाठी बीजप्रक्रियेचे महत्त्व स्पष्ट करत त्यांनी जैविक खतांचा वापर, बीजप्रक्रिया आणि घरगुती बियाण्यांची उगवणक्षमता तपासणी यांचे प्रात्यक्षिक सादर केले.

यावेळी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिकांचे वितरण करण्यात आले. महाडीबीटी योजनेंतर्गत निवड झालेल्या शेतकरी गटांना सोयाबीन बियाण्यांचे वाटपही करण्यात आले. शेतकरी गटांनी दशपर्णी अर्क, जीवामृत यांसारख्या सेंद्रिय घटकांच्या वापराबाबत प्रात्यक्षिके सादर करून शाश्वत शेतीचे महत्त्व अधोरेखित केले.

कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांनी रासायनिक खतांच्या उपलब्धतेसंदर्भातील समस्या मांडल्या. त्यावर जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी संबंधित यंत्रणेला तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. आगामी खरीप हंगामासाठी त्यांनी शेतकरी बांधवांना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमास प्रशिक्षणार्थी भा.प्र.से. अधिकारी मा. गुप्ता, अतिरिक्त जिल्हाधिकारी धार्मिक, गटविकास अधिकारी भोसले, उपविभागीय दंडाधिकारी लाटकर, तहसीलदार रणावरे, महसूल व कृषी विभागातील अधिकारी-कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक कृषी अधिकारी डी. जे. पवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन बिडगर यांनी मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या