सर्व स्तरातून अभिनंदन.........!!!!
कमी कालावधीत उत्कृष्ट काम : नाथरा येथील रमेश मुंडे यांचा रेल्वे सेवेतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल सन्मान
परळी वैजनाथ : प्रतिनिधी
परळी वैजनाथ तालुक्यातील नाथरा येथील रहिवासी रमेश जगन्नाथ मुंडे यांनी सेंट्रल रेल्वेच्या सोलापूर विभागात मेकॅनिकल विभागात कार्यरत असताना अल्पावधीत केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत त्यांचा १५ ऑगस्ट रोजी विशेष सन्मान करण्यात आला. रेल्वे सेवेत कर्तव्यनिष्ठा, समर्पण आणि उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.
रमेश मुंडे हे सेंट्रल रेल्वेच्या सोलापूर डिव्हिजनमध्ये मेकॅनिकल विभागात कार्यरत आहेत. आपल्या कामातील तत्परता, जबाबदारीची जाणीव आणि समर्पित वृत्तीच्या माध्यमातून त्यांनी कमी कालावधीत वरिष्ठांचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या या कामगिरीची दखल घेत स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाचे औचित्य साधून त्यांचा गौरव करण्यात आला. नाथरा या ग्रामीण भागातून पुढे येत रेल्वेसारख्या महत्त्वाच्या सेवाक्षेत्रात कार्यरत राहून उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या रमेश मुंडे यांच्या या यशाचे परळी वैद्यनाथ तालुक्यासाठी अभिमानास्पद म्हणून स्वागत होत आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन मिळालेला हा सन्मान त्यांच्या कुटुंबीयांसह नाथरा परिसरासाठीही आनंदाची बाब ठरला आहे.
या सन्मानाबद्दल रमेश मुंडे यांचे कुटुंबीय, मित्रपरिवार, नातेवाईक तसेच नाथरा आणि परळी वैजनाथ तालुक्यातील नागरिकांकडून सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
ग्रामीण भागातील युवकांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर मोठ्या संस्थांमध्ये उल्लेखनीय स्थान निर्माण करावे, यासाठी रमेश मुंडे यांचा प्रवास प्रेरणादायी ठरणारा आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा