कार्यकारिणीत समाजातील सर्व घटकांना प्रतिनिधित्व देण्याचा योग्य प्रयत्न

ना. पंकजा मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चाची दमदार टीम जाहीर



कार्यकारिणीत समाजातील सर्व घटकांना प्रतिनिधित्व देण्याचा योग्य प्रयत्न

बीड दि. २७ --- राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संजय आंधळे यांनी जिल्हा युवा मोर्चाची कार्यकारिणी घोषित केली आहे. युवा मोर्चाच्या या नव्या दमदार टीममध्ये समाजातील सर्व जाती धर्माच्या युवकांना प्राधान्य देऊन एक चांगला संदेश देण्यात आला आहे.


    ना. पंकजाताई मुंडे यांनी जिल्ह्यात भाजपची संघटनात्मक फळी मजबूत करण्याच्या दृष्टीने युवा मोर्चाच्या माध्यमातून युवकांना न्याय दिला आहे. नव्या कार्यकारिणीत समाजातील ओबीसी, मायक्रो ओबीसी, मराठा, मुस्लिम, मागासवर्गीय आदी विविध जाती धर्माला प्रतिनिधित्व देण्याचा योग्य प्रयत्न करण्यात आला आहे. यात ७ सरचिटणीस, ११ उपाध्यक्ष, १५ सचिव, १० सदस्य आणि एक कोषाध्यक्ष यांचा समावेश आहे.


*प्रत्येकांना न्याय देण्याचा प्रयत्न करू - ना. पंकजाताई*

--------

संघटनेत असंख्य कार्यकर्ते असताना प्रत्येकांना पदं देणं, यात सामावून घेणं माझ्यासाठी कठीण होतं, तरी देखील प्रत्येकांना संधी दिली आहे. भविष्यात वेगवेगळ्या माध्यमातून प्रत्येक कार्यकर्त्यांस न्याय देण्याचा माझा प्रयत्न असेल असे ना. पंकजाताई मुंडे म्हणाल्या.

अशी आहे नवी कार्यकारिणी

--------

युवा मोर्चाची जिल्हा कार्यकारिणी पुढीलप्रमाणे *सरचिटणीस* – चंद्रकांत देवकते (परळी), संग्राम बांगर (बीड), युवराज वायबसे, किशोर खोले (आष्टी), विष्णू आगे (माजलगाव), विकास पवार (गेवराई), उत्तरेश्वर र्निगुळे (केज), *उपाध्यक्ष –* संतोष सोळंके (परळी), विलास काचगुडे (अंबाजोगाई), ॲङ.नागेश तांबारे, पियुष सवई (बीड), विवेक पाखरे, संभाजी झांबरे (आष्टी), सुरज घुले (केज), रणजित रुपनर (धारुर), भिष्माचार्य दाभाडे (गेवराई), शहाजी सोळंके (माजलगाव), विनोद बांगर (पाटोदा), *कोषाध्यक्ष –* केशव बडे (बीड), *सचिव –* गोविंद मुंडे (परळी), मनोज कोरडे (माजलगाव), भुषण पवार, सुशिल जाधव, आनंद राऊत (बीड), माऊली पानसंबळ, सचिन वारे, आशिष जायभाये (शिरुर), मनोज गुंड, करण काळे (गेवराई), वैजनाथ देशमुख (केज), गणेश बडे (धारुर), महादेव लटपटे, शंभुराज महारनोर (आष्टी), सय्यद अन्सार (अंबाजोगाई), *सदस्य –* इश्वर भांगे, सुनिल चादर, श्यामसुदर पाटील (गेवराई), सुधीर सोनवणे (पाटोदा), अमोल वाघमारे, सुधाकर मुळे (बीड), तुकाराम हंडे (माजलगाव), रुपेश लगड, बाळासाहेब तिडके (धारुर), संतोष गडदे (अंबाजोगाई)

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार