28 फेब्रुवारी पासून शेतकरी कीर्तन महोत्सव किरण माने, मयांक गांधी, विलास बडे, पैगंबर शेख, स्वप्निल चौधरी अजित अभ्यंकर यांच्यासह दिग्गजांचे मार्गदर्शन सिरसाळा ( प्रतिनिधी) : शेतकरी कीर्तन महोत्सव हा परळी तालुक्यातील अभिनव प्रबोधन महोत्सव म्हणून ओळखला जात असून या किर्तन महोत्सवाची महाराष्ट्रभर उत्सुकता असते. यावर्षीच्या शेतकरी कीर्तन महोत्सवात सुप्रसिद्ध अभिनेते किरण माने, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मयांक गांधी, ज्येष्ठ पत्रकार विलास बडे, सामाजिक कार्यकर्ते पैगंबर शेख, प्रसिद्ध कवी डॉ. स्वप्निल चौधरी, जेष्ठ अर्थतज्ञ डॉ. अजित अभ्यंकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती शेतकरी कीर्तन महोत्सवाचे संयोजक एड. अजय बुरांडे यांनी दिली. जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या बिजोत्सवाच्या निमित्ताने 28 फेब्रुवारी ते 6 मार्च यादरम्यान यावर्षीचा शेतकरी कीर्तन महोत्सव होत आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा बीजोत्सव जवळ येऊ लागतो तसा परळी तालुक्यातील शेतकऱ्यांना कीर्तन महोत्सवाची उत्सुकता लागून राहते. धारूर...