मतदार यादी विशेष पुनरीक्षण मोहिमेच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांना निवडणूक कामावर पूर्णवेळ लक्ष देण्याच्या सूचना
SIR-2026| विशेष पुनरीक्षणासाठी बीएलओ म्हणून नियुक्त शिक्षकांना इतर कामांतून मुक्त करा; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश मतदार यादी विशेष पुनरीक्षण मोहिमेच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांना निवडणूक कामावर पूर्णवेळ लक्ष देण्याच्या सूचना बीड | प्रतिनिधी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR)-2026 कार्यक्रमासाठी बीएलओ (Booth Level Officer) म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांना इतर प्रशासकीय व शालेय कामांमधून मुक्त करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिले आहेत. शिक्षण विभागाकडून जारी करण्यात आलेल्या पत्रानुसार, २४ जून ते २६ जुलै २०२६ या कालावधीत बीएलओंना मतदार यादी पुनरीक्षणाचे काम प्रभावीपणे पार पाडण्यासाठी Enumeration Forms (EF) भरणे, माहिती संकलन, पडताळणी व अन्य निवडणूकविषयक जबाबदाऱ्या पूर्ण कराव्या लागणार आहेत.या कालावधीत बीएलओ म्हणून नियुक्त शिक्षकांना कोणतेही अतिरिक्त प्रशिक्षण, बैठक, राष्ट्रीय योजना, सर्वेक्षण किंवा इतर प्रशासकीय कामे देऊ नयेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. शाळेतील आ...