ना. पंकजा मुंडेंनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट



बीड जिल्हयातील विविध विकासाच्या मुद्द्यावर चर्चा ; परळीतील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या भूमिपूजनाचेही दिले निमंत्रण

मुंबई दि. १० ---

राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांनी आज उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट घेऊन बीड जिल्हयाच्या विविध विकास प्रश्नांवर सकारात्मक चर्चा केली. परळी येथे होणाऱ्या नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या भूमिपूजनाचे निमंत्रण त्यांनी यावेळी सुनेत्राताईंना दिले.

  ना. पंकजाताई मुंडे यांनी आज दुपारी देवगिरी बंगल्यावर उप मुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट घेतली. या प्रसंगी बीड जिल्ह्याच्या विविध विकासकामांच्या संदर्भात त्यांच्याशी अतिशय सकारात्मक चर्चा झाली.या भेटी दरम्यान, परळी वैजनाथ येथे नव्यानेच होत असलेल्या 'पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या' भूमिपूजन सोहळ्याचे आग्रहाचे निमंत्रणही त्यांनी सुनेत्राताईंना दिले. जिल्ह्याच्या प्रगतीसाठी आणि लोककल्याणाच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरेल, असा विश्वास ना.पंकजाताईंनी यावेळी व्यक्त केला.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...