युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS- *१९८२ ची जुनी पेन्शन लागु करा: जुनी पेन्शन कोर कमिटीची मागणी* *सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना दिले निवेदन*

 *१९८२ ची जुनी पेन्शन लागु करा: जुनी पेन्शन  कोर कमिटीची मागणी*



*सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना दिले निवेदन

परळी प्रतिनिधी - : जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सामाजिक  न्याय मंत्री नामदार धनंजय मुंडे  यांना ०१/११/२००५ पुर्वी नियुक्त व नंतर १००% अनुदानावर आलेल्या शालेय कर्मचाऱ्याना विना अट १९८२ची जुनी पेन्शन लागु करावी या बाबत परळी वैजनाथ जि.बीड येथे निवेदन देण्यात आले.

या वेळी राज्य जुनी पेन्शन कोअर कमिटीचे  उपाध्यक्ष बालासाहेब इंगळे सर,बीड जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत गायकवाड सर,राज्य संघटक मधुकर घुगे सर,बीड जिल्हा संघटक संजय इंगळे सर,परळी वैजनाथ चे श्रीहरी दहिफळे सर,राजाभाऊ राठोड सर,सुरेश कराड सर,मिलिंद नरबागे सर,ज्ञानोबा सावंत सर,अनिल केंद्रे सर,रामेश्वर ओझा सर,बालाजी अंबाड सर,मंगल तोडकर मॅडम,वर्षा गुळवे मॅडम,मदन कराड सर,सिद्धार्थ रोडे सर,अष्टीचे प्रा.बशीर सय्यद सर,धीमधीमे सर उपस्थित होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या