MB NEWS- *विविध मागण्यांसाठी आशा व गटप्रवर्तकांनी केली परळीत निदर्शने* 🌑 _१५ जुन पासुन सुरु झालेला बेमुदत संप सुरूच_ 🌑

 *विविध मागण्यांसाठी आशा व गटप्रवर्तकांनी केली परळीत निदर्शने* 



🌑 _१५ जुन पासुन सुरु झालेला बेमुदत संप सुरूच_ 🌑 

परळी वैजनाथ, प्रतिनिधी..,  

         करोना संकटात जीव धोक्यात घालून काम करतानाही सुरक्षितता आणि मानधनवाढीवर सरकार निर्णय घेत नसल्याने आशा सेविका व गटप्रवर्तकांनी विविध माध्यमातून आंदोलन सुरू च ठेवले आहे. १५ जुन पासुन आशा वर्कर्स चा बेमुदत संप सुरूच आहे.आज दि.२२ रोजी बीड जिल्हा आशा वर्कर्स युनियन ने परळीत जोरदार निदर्शने केली. 

      ‘आशां’ना किमान १८ हजार रुपये व गटप्रवर्तकांना किमान २२ हजार रुपये मानधन द्यावे, शासकीय कर्मचारी म्हणून दर्जा द्या,‘आशां’ना भत्ते वाढवुन द्यावे आदी विविध मागण्यांसाठी निदर्शने करण्यात आली.या आंदोलनात बीड जिल्हा आशा वर्कर्स युनियनचे पदाधिकारी, सिटु चे जिल्हा अध्यक्ष प्रा.बी.जी.खाडे, तालुकाध्यक्ष किरण सावजी, सुवर्णा रेवले, अशा मुंडे,मायादेवी बनसोडे, प्रियंका घागरमाळे,रेखा वाघमारे, सुरेखा भिसे,सुलताना तांबोळी, सत्यभामा सुरवसे, खाजाजी शेख,सुषमा साखरे, मंगल गित्ते,संगीता मुंडे, सुनिता पवार, इंदुबाई कुकर, सुमित्रा पवार,हेमा काळे,अनिता गिराम, सुरेखा फड,मजुषा बिक्कड, सुनिता काळे,गौळण मोरे दिपमाला रोडे, अर्चना पोले, सुनीता राठोड,वर्षा कोकाटे, सुनीता मुंडे आदींसह आशा वर्कर्स व गटप्रवर्तक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !