MB NEWS-परळीत सेवाधर्मातील ' सेवाधर्मींचा' धनुभाऊंनी केला 'सेवा गौरव' !

 परळीत सेवाधर्मातील ' सेवाधर्मींचा' धनुभाऊंनी केला 'सेवा गौरव' ! 



*'सेवाधर्मींनो, तिसऱ्या लाटेत मृत्यू रोखण्याचा संकल्प करा- धनंजय मुंडे यांचे आवाहन*

*

परळी (दि. 21) ------ : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करताना ऑक्सिजनच्या एका सिलेंडर साठी रात्र रात्र जागून काढली. एक-एक व्यक्तीचे प्राण वाचविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली; याच काळात परळीतील जनतेला आधार देता यावा यासाठी आम्ही सेवाधर्म हा उपक्रम सुरू केला होता. शासकीय सेवेतील व अशासकीय सेवेतील सेवाधर्म जोपासलेल्या, सेवाधर्म उपक्रमातील सेवेच्या सर्व वाहकांचा आज गौरव करून समारोप करताना अभिमान वाटत आहे, अशा शब्दात सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी परळीतील सर्व कोविड योद्ध्यांच्या प्रति आपली कृतज्ञता व्यक्त केली आहे.



राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या वतीने कोविड वॉरियर्सच्या गौरव कृतज्ञता समारोह संपन्न झाला. या समारोहामध्ये ना. मुंडे यांच्या हस्ते कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत निस्वार्थपणे स्वतःला झोकुन देऊन काम करणाऱ्या शासकीय सेवेतील व खाजगी डॉक्टर्स, वैद्यकीय अधिकारी, पॅरा मेडिकल स्टाफ, कोविड सेंटर चालवणारे अन्य कर्मचारी, महसुली अधिकारी, पोलीस अधिकारी, महावितरणचे अधीकारी, शिक्षक, लसीकरण प्रक्रियेतील कर्मचारी, सेवाधर्म अंतर्गत काम केलेले स्वयंसेवक, विविध सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते, रुग्णवाहिका चालक, रुग्णांना जेवण पुरवणाऱ्या संस्था, मोफत सेवा दिलेले रिक्षाचालक, विविध अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, आशा वर्कर्स, स्मशान भूमीतील कामगार/रक्षक, आदींचा सन्मान करण्यात आला. 


या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक पत्रकार, पत्रकार संघटनांनी सेवाधर्म जोपासून सोबतच व्यापक जनजागृती करण्यात योगदान दिले, अशा सर्व पत्रकार व पत्रकार संघटनांचा धनंजय मुंडे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. पत्रकारांचा कोरोना योद्धे म्हणून गौरव करण्यात येणारा हा राज्यातील पहिलाच कार्यक्रम आहे.


कोरोनाच्या पहिल्या लाटेत विषाणूच्या भीतीने माणुसकी हरवली की काय असा आभास होत होता, मात्र दुसऱ्या लाटेत माणुसकीचे मूर्तिमंत दर्शन घडले. दुसऱ्या लाटेत अनेक प्रयत्न करून देखील अनेक निष्पाप नागरिकांनी आपले प्राण गमावले, सर्व कोविड योद्ध्यांनी आपले प्राण पणाला लावून सेवा भाव जोपासला, त्या सर्वांचा सन्मान करणे हे लोकप्रतिनिधी म्हणून आपले कर्तव्य आहे, परंतु प्रभू वैद्यनाथाच्या भूमीत सेवा कार्य केलेल्या प्रत्येकाचा गौरव स्वतः प्रभू वैद्यनाथ पाहत आहेत, असे गौरवोद्गार ना. मुंडेंनी यावेळी काढले.


*तिसऱ्या लाटेत मृत्यू रोखण्याचा संकल्प करा...*

दुसरी लाट आटोक्यात येते न येते त्यातच तज्ञ आता तिसऱ्या लाटेचा शक्यता वर्तवत आहेत, अशा काळात ऑक्सिजन प्लांट, औषध सामग्री यांसह सर्व सुविधा निर्माण करण्यासाठी शासन स्तरावरून निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. अगदी जे मागाल ते देऊ, मात्र आता तिसऱ्या लाटेत कोणाचेही प्राण जाणार नाहीत, अशी तयारी करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन ना. मुंडे यांनी यावेळी बोलताना केले.


यावेळी आ. संजय दौंड, नगराध्यक्षा सौ. सरोजनीताई हलगे, जि. प. गटनेते अजय मुंडे, न.प. गटनेते वाल्मिक अण्णा कराड, बहुजन विकास मोर्चाचे अध्यक्ष बाबुराव पोटभरे, पं. स. सभापती बालाजी मुंडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ऍड गोविंदराव फड, सुरेश टाक, बाजीराव भैय्या धर्माधिकारी, लक्ष्मणराव पौळ, प्रा. विनोद जगतकर, सूर्यभान नाना मुंडे, राजाभाऊ पौळ, अरुण बरकसे, अनंत इंगळे यांसह सर्व नगरसेवक व पदाधिकारी तसेच उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे, तहसीलदार सुरेश शेजुळ, डॉ. शिवाजी सुक्रे, डॉ. दिनेश कुर्मे, डॉ. लक्ष्मण मोरे, डॉ. राजाराम मुंडे, अंगणवाडी सेविका संघटनेच्या श्रीमती मोहोड, श्रीमती रोडे यांसह परळी मतदारसंघातील डॉक्टर्स, वैद्यकीय अधिकारी, अत्यावश्यक सेवेतील सर्व अधिकारी-कर्मचारी आदी उपस्थित होते. 


*यांचा झाला गौरव...*

या कार्यक्रमात उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे, स्वारातीचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, महजेनकोचे मुख्य अभियंता मोहन आव्हाड, तहसीलदार सुरेश शेजुळ, न.प. मुख्याधिकारी अरविंद मुंडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनेश कुर्मे, बीडीओ संजय केंद्रे, डॉ. लक्ष्मण मोरे, डॉ. बाळासाहेब लोमटे, डॉ. सिद्धेश्वर बिराजदार, डॉ. अर्षद शेख, नायब तहसिलदार बाबुराव रुपनर, महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रशांत अंबाडकर, लोखंडी कोविड सेंटरच्या प्रमुख डॉ. अरूणा केंद्रे, आशा वर्कर्सच्या समन्वयक शीतल तिडके, यांसह शासकीय सेवेतील व खाजगी सेवा देणारे सर्व डॉक्टर्स, पोलीस अधिकारी, महसूल प्रशासनातील अधिकारी, शिक्षक, नर्स, फार्मासिस्ट, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, रुग्णवाहिका चालक, स्मशानभूमीतील कामगार-रक्षक, मोफत सेवा देणारे बस व रिक्षा चालक, सेवा धर्म उपक्रमातील स्वयंसेवक, त्याचबरोबर विविध कोविड सेंटरचे संचालक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी, राधामोहन प्रतिष्ठान, अन्नपूर्णा चॅरिटेबल ट्रस्ट, एक हात मदतीचा ग्रुप, जमात ए इस्लामी ऑर्गनायझेशन, न्यू सहारा सेवाभावी संस्था, स्व. पंडित अण्णा मुंडे शेतकरी भोजनालय यांसह सेवा कार्यात आपले योगदान दिलेल्या व्यक्ती, समूह, संस्था सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी अशा 170 जणांचा या कार्यक्रमात ना. मुंडेंच्या हस्ते सन्मानपत्र, शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन गोविंद केंद्रे यांनी केले

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !