युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS-नवनिर्वाचित जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव निवडीचे परळीत स्वागत; जुन्या शिवसैनिकानी, अतिषबाजी केली, मिठाई वाटली

 नवनिर्वाचित जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव निवडीचे परळीत स्वागत; जुन्या शिवसैनिकानी अतिषबाजी केली, मिठाई वाटली



    परळी वै;-

                संघटना वाढविण्याच्या पार्श्वभूमीवर,शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे  यांच्या आदेशावरून, संपर्क प्रमुख आंनद जाधव यांच्या सूचनेनुसार, नवनिर्वाचित जिल्ह्याप्रमुख म्हणून आप्पासाहेब जाधव यांची निवड करण्यात आली.

      नवनिर्वाचित जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव निवडीचे परळीत स्वागत; जुन्या शिवसैनिकानी, अतिषबाजी केली, मिठाई वाटली.माजी शहर प्रमुख भोजराज पालीवाल यांच्या नेतृत्वाखाली, मोठया प्रमाणात आतिषबाजी करण्यात आली, व मिठाई वाटून आनंदउत्सव साजरा करण्यात आला.

       यावेळी, माजी शहर प्रमुख भोजराज पालीवाल, विद्यार्थी सेना तालुका प्रमुख महेश पप्पू केंद्रे,शिवसेना माजी उपशहर प्रमुख सचिन स्वामी,शिवसेना शिवाजी नगर विभाग प्रमुख प्रकाश साळुंखे, शहर संघटक संजय कुकडे,माजी युवा सेना शहर प्रमुख सचिन लोढा, बालासाहेब देशमुख, गणेश पार विभाग प्रमुख संजय गावडे,शिवाजी दराडे, विशाल सुगरे,विजय जाधव,बाबुलाल पिंपळे, बालाजी नागगोजे,हरीश धामट,आदी सह मोठया प्रमाणावर शिवसैनिक उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या