युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS-परळीत चार दिवसांपूर्वी बेपत्ता असलेल्या महिलेचा मृतदेह आढळला

 परळीत चार दिवसांपूर्वी बेपत्ता असलेल्या  महिलेचा मृतदेह आढळला 

मयत महिलेचे संग्रहित छायाचित्र


परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

        शहरातील वडसावित्रीनगर भागातील रहिवासी असलेल्या महिलेचा मृतदेह याच भागातील एका विहीरीत आढळला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.चार दिवसांपासून ही महिला बेपत्ता होती.दरम्यान ही आत्महत्या की घातपात हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

        याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, परळी शहरातील वडसावित्रीनगर या भागातील विवाहित महिला दि.१९ रोजी घरातून बेपत्ता असल्याची नोंद शहर पोलीसांकडे करण्यात आली होती. सौ.कोमल सोमनाथ पडुळकर वय १९ वर्षं असे या मयत महिलेचे नाव आहे.दि.१९ रोजी ही महिला पहाटे ६ वा.सुमारास सडा टाकण्यासाठी शेण घेउन येते म्हणून घराबाहेर पडली होती ती परत आलीच नाही.कुटुंबियांनी शोधाशोध केली पण शोध लागला नाही त्यामुळे शहर पोलिस ठाण्यात महिला बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली. सात महिन्यांपूर्वी च या महिलेचा विवाह झाला होता. दरम्यान वडसावित्रीनगर भागातील एका विहीरीत मृतदेह तरंगताना आढळून आला.शहर पोलीसांनी आज दि.२२ घटनास्थळी जाऊन मृतदेहाची ओळख पटवून उत्तरीय तपासणीसाठी शव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या महिलेने आत्महत्या केली आहे का घातपात आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी मयत महिलेच्या नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.अधिक तपास पोलीस जमादार गोविंद बडे हे करीत आहेत.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या