युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS-जिल्हा पोलिस दलास सक्षम करण्यासाठी सर्वकाही देऊ, गुन्हेगारांना पोलिसांचा धाक वाटावा असे वातावरण निर्माण करा - धनंजय मुंडे*

  *जिल्हा पोलिस दलास सक्षम करण्यासाठी सर्वकाही देऊ, गुन्हेगारांना पोलिसांचा धाक वाटावा असे वातावरण निर्माण करा - धनंजय मुंडे*



पोलीसांसाठी नवीन वाहनं :सकाळीच एमबी न्युजने बातमीत केले होते अधोरेखित पालकमंत्री यांनी दुपारी केले नव्या कोऱ्या १६५ वाहनांचे लोकार्पण 

बीड, प्रतिनिधी.....

      पोलीसांना देण्यात आलेल्या गाड्यांची आता खुप जुन्या झालेल्या आहेत.पोलीसांना नविन अद्यावत गाड्या उपलब्ध करुन देण्यात याव्यात अशी अनेक दिवसापासून मागणी आहे.अशा अपघातानंतर ही मागणी ऐरणीवर आली आहे. अशा आशयाने एमबी न्युज ने आज सकाळीच  परळी पोलीसांच्या गाडीला झालेल्या अपघाताच्या बातमीत अधोरेखित करण्यात आले होते. दुपारी बीड येथे झालेल्या कार्यक्रमात पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांनी पोलीसांना डी तब्बल १६५ नवी कोरी वाहनांचे लोकार्पण केले आहे.




             बीड जिल्हा पोलिस दलास जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आवश्यक वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत, या व्यतिरिक्त पोलीस दलास सक्षम करण्यासाठी आवश्यक ते सर्वकाही संसाधने व आधुनिक उपकरणे उपलब्ध करून देऊ, जिल्हा पोलिस दलाने गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांमध्ये कायद्याचा धाक निर्माण व्हावा तसेच सर्वसामान्य लोकांना कायद्याचे राज्य आहे अशी जाणीव निर्माण व्हावी असे वातावरण निर्माण करावे, असे आवाहन बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बीड जिल्हा पोलिस दलास केले आहे. बीड जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्हा पोलिस दलास 151 मोटारसायकल, 8 स्कॉर्पिओ, डायल 112 पथकासाठी 2 बोलेरो, तसेच 2 टियूव्ही गाड्या असे एकूण 165 वाहने खरेदी केल्या असून, आज धनंजय मुंडे यांच्या हस्ते या गाड्यांचे एका दिमाखदार सोहळ्यात लोकार्पण करण्यात आले. 




      यावेळी आ. संदीप क्षीरसागर, आ. संजय दौंड, मा.आ. सुनील धांडे, मा.आ.सय्यद सलीम, जिल्हा परिषद उपाध्यक्षबजरंग सोनवणे, राष्ट्रवादी युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, शिवसेना जिल्हा प्रमुख सचिन मुळूक, शिवसेना जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी तसेच बीड चे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप, सीईओ अजित कुंभार, पोलिस अधीक्षक आर. राजा, तसेच सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी - कर्मचारी उपस्थित होते.जिल्ह्यात प्रत्येक पोलीस ठाण्यांतर्गत 1 बीट अंमलदार या महिला असणार आहेत. अशाप्रकारची संधी बीड जिल्ह्यात पहिल्यांदाच देण्यात आली आहे. याशिवाय 6 पिंक मोबाईल पथके महिला सुरक्षेसाठी विशेष स्थापन करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील गुन्हेगारीवर आळा घालण्यासह कोविड विषयक निर्बंधाचे पालन करण्यासाठी संपूर्ण पोलीस दल अविरतपणे कार्यरत आहे, याबद्दल ना. मुंडेंनी पोलिसांचे कौतुक करत उत्तम कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली.  


जिल्हा पोलिस अधीक्षक आर. राजा यांनी आपल्या प्रास्ताविक कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांनी आभार मानले.


गेल्या एक अधिक वर्षाच्या काळात कोविड विषयक कामगिरी व पोलीस दलापुढील विविध आव्हाने या दरम्यान बीड पोलिसांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीचा लेखाजोखा मांडणारे 'ध्यासपर्व' या विशेष पुस्तकाची निर्मिती बीड जिल्हा पोलिसांनी केली असून, ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या