युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS-पंकजाताई मुंडे यांनी पुणे, पिंपरी चिंचवड मधून फुंकले ओबीसी आंदोलनाचे रणशिंग !*

 *पंकजाताई मुंडे यांनी पुणे, पिंपरी चिंचवड मधून फुंकले ओबीसी आंदोलनाचे रणशिंग !*



*ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा लढा व्होट बॅंकेचा नसून सन्मानाचा*


*२६ जूनचे चक्का जाम आंदोलन लक्षवेधी करण्याचे पदाधिकाऱ्यांना केले आवाहन*



पुणे । दिनांक २०।

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज पुणे व पिंपरी चिंचवड मधून ओबीसी आंदोलनाचे रणशिंग फुंकले. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा लढा हा 'व्होट बँकेचा' नसून भाजपच्या मुळ तत्वांचा, सन्मानाचा आणि संस्काराचा असल्याचे त्या म्हणाल्या. २६ जून रोजी होणाऱ्या चक्का जाम आंदोलनाने शहर दणाणून सोडा असे आवाहन त्यांनी पदाधिकाऱ्यांना केले.


  ओबीसींचे राजकीय आरक्षण राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे रद्द झाल्याच्या निषेधार्थ भाजपच्या वतीने २६ जून रोजी राज्यव्यापी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. या पार्श्‍वभूमीवर पंकजाताई मुंडे यांनी आज पुणे व पिंपरी चिंचवड येथे भाजपाच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. बैठकीस शहर जिल्हाध्यक्ष जगदीश मुळीक, ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, आ. माधुरी मिसाळ, आ. महेश लांडगे, आ. लक्ष्मण जगताप, पिंपरीच्या महापौर मायताई ढोरे, उमाताई खापरे, सदाशिव खाडे, आ. सिद्धार्थ शिरोळे, पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, ॲड. मोरेश्वर शेडगे, अशोक मुंडे, योगेश पिंगळे, दत्ताभाऊ खाडे आदी उपस्थित होते.


  संघर्ष ही आपली ताकद आहे. कोरोना महामारीनंतर ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मोठा विषय घेऊन आपण याची सुरवात करत आहोत. बहूजनांना ताकद देण्याचे काम ज्यांनी केले, ओबीसींच्या आरक्षणाचा पाया ज्यांनी रचला त्या छत्रपती शाहू महाराज यांच्या २६ जून हया जन्मदिवशी आपण सामाजिक न्यायाची मागणी करत आहोत. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा हा लढा कुठल्या व्होट बँकेसाठी नसून भाजपच्या मुळ तत्वांचा, सन्मानाचा आणि संस्काराचा आहे. समाजातील वंचित वर्गच जर धोक्यात येत असेल तर राष्ट्र धोक्यात येते. ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आणण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने केले आहे. सरकारचा धिक्कार करण्यासाठी आणि आरक्षण मिळाल्याशिवाय निवडणूका होऊ देणार नाहीत हा नारा घेऊन आपण २६ जूनच्या रास्ता रोको आंदोलनात ताकदीनिशी उतरायचे आहे. प्रत्येक लोकप्रतिनिधींनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह आंदोलनात सहभाग घेऊन शहर दणाणून सोडावे असे आवाहन पंकजाताई मुंडे यांनी यावेळी केले. बैठकीनंतर विविध ओबीसी संघटनांच्या प्रतिनिधींच्या भेटी घेऊन पंकजाताई मुंडे यांनी चर्चा केली. 

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या