MB NEWS- *पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य सेवा सप्ताहाचा शानदार शुभारंभ; अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात !*

 *पालकमंत्री ना.धनंजय मुंडे  यांच्या वाढदिवसा निमित्त आरोग्य सेवा सप्ताहाचा शानदार शुभारंभ; अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात !*



🕳️  *_सामान्यांचे असामान्य कैवारी ना.धनंजय मुंडे- सौ.शिवकन्या सिरसाट_*



🕳️ *सतत अग्रेसर राहून चौफेर विकासाची गंगा आणणारं विकासप्रिय नेतृत्व ना धनंजय मुंडे- अजय मुंडे*



🕳️ *_कार्यकर्त्यांचे जीवलग, जाज्वल्य व परिसस्पर्शी नेतृत्व ना.धनंजय मुंडे- बाजीराव धर्माधिकारी_*




परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

          राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार  व सामाजिक न्यायमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त 15 ते 22 जुलै दरम्यान राष्ट्रवादी  काँग्रेसच्या वतीने आरोग्य सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या आरोग्य आरोग्य सेवा सप्ताहाचा शुभारंभ व ना.धनंजय मुंडे अभिष्टचिंतन कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी आपल्या लाडक्या नेत्याविषयी भरभरुन मनोगत व्यक्त करुन प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ना.धनंजय मुंडे यांच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला.



          राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आज गुरुवार दिनांक 15 जुलै रोजी लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंग मंदिर येथे ना.धनंजय मुंडे "अभिष्टचिंतन सोहळा", संजय गांधी निराधार योजनेच्या 1500 लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचे वाटप  व महात्मा फुले आरोग्य योजनेच्या कार्ड नोंदणीच्या शिबीराचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी ना.धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून अभिष्टचिंतन करण्यात आले.यावेळी ना.धनंजय मुंडे यांचे अभिष्टचिंतन करतांना पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले.सामान्यांचे असामान्य कैवारी म्हणजे ना.धनंजय मुंडे असुन तळागाळातील लोकांपर्यंत विकास पोहचवून सर्व सामान्य माणसाला न्याय देण्याची त्यांची भुमिका असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.शिवकन्या सिरसाट यांनी सांगितले. मंत्रीपद, पालकमंत्री, नगर परिषद, जिल्हा परिषदच्या माध्यमातून चौफेर विकासाची गंगा आणणारा हा खराखुरा विकास भगिरथ असुन सतत अग्रेसर व विकासप्रिय नेतृत्व म्हणजे ना धनंजय मुंडे असल्याचे गौरवोद्गार जि.प.गटनेते अजय मुंडे यांनी काढले. कार्यकर्त्यांचे जीवलग, जाज्वल्य व परिसस्पर्शी नेतृत्व म्हणून ना.धनंजय मुंडे यांच्या शिवाय दुसरा नेता नाही.सामान्य कार्यकर्त्यांला शक्ती देत राजकीय परिपक्व बनवणारे हे नेतृत्व आहे.राज्याच्या राजकीय पटलावरील अग्रभागी असलेले नेतृत्व हे आपले जीवलग असते तेव्हा अभिमानाने उर भरून येतो असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस चे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी केले. 

  


   कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्षा   सौ. शिवकन्याताई शिरसाठ, गटनेते अजय मुंडे,नगराध्यक्षा सौ.सरोजनीताई हालगे,नप गटनेते वाल्मीकअण्णा कराड,उपविभागीय अधिकारी सौ.नम्रताताई चाटे, तहसीलदार सुरेशराव शेजुळ,महानिर्मितीचे महाव्यवस्थापक मोहन आव्हाड,मजूर फेडरेशनचे अध्यक्ष बंसीअण्णा शिरसाठ,प्रदेश उपाध्यक्ष युवक डॉ.संतोष मुंडे,पंचायत समिती सभापती बालाजी उर्फ पिंटू मुंडे, तालुकाध्यक्ष लक्ष्मण पौळ, शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी,उपनगराध्यक्ष शकील कुरैशी,सामाजिक न्यायचे जिल्हाध्यक्ष प्रा.डॉ. विनोद जगतकर सर,मार्केट सदस्य माणिकभाउ फड,सुरेश टाक,बाशीत भाइ,संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष राजाभाऊ पौळ, जि.प.सदस्य सौ.जयश्रीताई शेप,जिल्हा मध्यवर्ती बँक सदस्य सूर्यभान मुंडे,जिल्ह्या नियोजन मंडळ सदस्य वैजनाथ सोळके,शिवसेना शहरप्रमुख राजेश विभुते,शहर सरचिटणीस अनंत इंगळे,महिला आघडीच्या प्रदेश नेत्या सौ.रेखाताई फड,जिल्ह्याध्यक्ष सौ.संगीताताई तुपसागर,माजी नगराध्यक्ष जाबेर खान पठाण,अय्यूबभाई पठाण,शरद मुंडे,सुरेश टाक, वैजनाथ बागवाले,रविंद्र परदेशी,स्वच्छ्ता सभापती अनवर मिस्कीन,विजय भोयटे,शंकर आडेपवार,श्रीकृष्ण कराड,पाणी पुरवठा सभापती गोविंद मुंडे,किशोर पारधे,चेतन सौंदमळे,बालाजी चाटे,शिक्षण सभापती गोपाळ आंधळे, नगरसेवक अनिल आष्टेकर,संजय फड,जयराज देशमुख,गोविंद कुकर,शेख शम्मो,अझिझ कच्छी, जयप्रकाश लड्डा,संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य नितिन कुलकर्णी,रमेश चौण्डे,सूर्यकांत मुंडे,अशोक डिघोळे,बंडू तांदले,अमोल कानडे, इंद्रजीत होलंबे, साजन लोहिया,युवक तालुकाध्यक्ष संतोष शिंदे, शहराध्यक्ष सय्यद सिराज,महिला आघाडी अध्यक्ष अर्चनाताई रोडे,युवती आघाडी तालकाध्यक्ष सुलभाताई साळवे,शहराध्यक्ष पल्लवीताई भोयटे,अन्नपूर्णाताई जाधव, चित्राताई देशपांडे,शिक्षक आघडीचे शहराध्यक्ष अजय जोशी सर,ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष के.डी.उपाडे, अल्पसंख्यक आघडीचे अध्यक्ष नाझेर हुसैन,तालुकाध्यक्ष युवक अल्ताफ पठाण, गफार काकर,राष्ट्रवादी सेवा दलचे अध्यक्ष लालाभाई पठाण, सामाजिक न्यायचे तालुकाध्यक्ष दत्तभाऊ सावंत,अमर रोडे, आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🌑 *मोफत रक्तदाब व मधुमेह तपासणी शिबीराचा लाभ घ्यावा......*

    दरम्यान शुक्रवार दिनांक 16 जुलै रोजी धनंजय मुंडे आरोग्य मित्र यांच्या संयुक्त विद्यमाने परळी शहरात विविध 100 भागात संपन्न होणाऱ्या मोफत रक्तदाब व मधुमेह तपासणी शिबीराचा शुभारंभ होत आहे.या शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहनराष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण पौळ, शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकरी, सरचिटणीस अनंत इंगळे, युवा तालुकाध्यक्ष संतोष शिंदे, युवा शहराध्यक्ष सय्यद सिराज, महिला आघाडीच्या अर्चनाताई रोडे,पल्लवी भोयटे,सुलभा साळवे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी परळी शहर व तालुका यांच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !