MB NEWS-परळी शहरातुन मोटार सायकलींची तर ग्रामीण भागात जनावरांची चोरी ; सर्वत्र चोरीच्या घटना वाढल्या

 परळी शहरातुन मोटार सायकलींची तर ग्रामीण भागात जनावरांची चोरी ; सर्वत्र चोरीच्या घटना वाढल्या


परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

       परळी व तालुक्यात गुन्हेगारी करणारांना मोकळे रान मिळाले आहे.कोरोनाकाळात उत्पन्नाचे सर्व स्त्रोत बंद झाले आहेत.प्रत्येकजण यातूनच जात आहे.मग चोर, चोरटे आणि भुरटे चोर यांचीही प्रचंड विवंचना झालेली आहे त्यामुळे संधी दिसताच डल्ला मारण्यासाठी चोरटे आसुसलेले आहेत.विविध ठिकाणांहून अनेकांच्या मोटारसायकली मोठ्या प्रमाणावर चोरीला जात असल्याचे समोर आले आहे.शहरातुन मोटारसायकलींची तर ग्रामीण भागात जनावरांची चोरी होत असल्याचे दिसून येते. सर्वत्र चोरीच्या घटना वाढल्या असल्याने यावर प्रतिबंधक उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.

       

      परळी शहरातुन मोटारसायकलींची तर ग्रामीण भागात जनावरांची चोरी होत असल्याचे दिसून येते. ग्रामीण भागातील म्हैशी चोरीला गेल्याच्या दोन वेगवेगळ्या घटनांची नोंद पोलीसात झाली आहे.यामध्ये कन्हेरवाडी व दैठणाघाट येथील म्हैस चोरीच्या घटनांचा समावेश आहे.कन्हेरवाडी येथील सुनील सावळाराम फड यांच्या राहत्या घरासमोर बांधलेली संकरीत जातीची म्हैस (किंमत अंदाजे ४०,०००) अज्ञात चोरांनी चोरुन नेली आहे.तर दुसऱ्या घटनेत दैठणाघाट येथील जगन्नाथ बाबुराव सानप यांची मुरा जातीची म्हैस (किंमत अंदाजे ७५,०००) शेतातील कोठ्यातुन चोरुन नेली आहे.याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास ग्रामीण पोलीस करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !