प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

MB NEWS-परळीत पाव्हण्यांना येणंही झालं अवघड: मोटारसायकल चोरीचे सत्र सुरूच

 परळीत पाव्हण्यांना येणंही झालं अवघड: मोटार सायकल चोरीचे सत्र सुरूच

 


 परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

         परळी व तालुक्यात गुन्हेगारी करणारांना मोकळे रान मिळाले आहे.कोरोनाकाळात उत्पन्नाचे सर्व स्त्रोत बंद झाले आहेत.प्रत्येकजण यातूनच जात आहे.मग चोर, चोरटे आणि भुरटे चोर यांचीही प्रचंड विवंचना झालेली आहे त्यामुळे संधी दिसताच डल्ला मारण्यासाठी चोरटे आसुसलेले आहेत.विविध ठिकाणांहून अनेकांच्या मोटारसायकली मोठ्या प्रमाणावर चोरीला जात असल्याचे  समोर आले आहे. बाहेरगावाहून आलेल्या पाहुण्याची मोटारसायकल काही वेळातच चोरीला गेल्याची घटना स्वातीनगर भागात घडली आहे.

          शहरातुन मोटारसायकलींची तर ग्रामीण भागात जनावरांची चोरी होत असल्याचे दिसून येते. सर्वत्र चोरीच्या घटना वाढल्या असल्याने यावर प्रतिबंधक उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. सुग्रीव संभाजी सांगळे  रा. चाटगाव ता.धारुर हे स्वातीनगर भागात राहणाऱ्या आपल्या पाव्हण्याकडे आपल्या मोटारसायकल वर आले होते.घरासमोर मोटारसायकल लावलेली होती.अज्ञात चोरट्यांनी या मोटारसायकल चे हॅण्डललाॅक तोडून मोटारसायकल चोरुन नेली.याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास शहर पोलीस करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या