इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS-⬛ आजचे राशिभविष्य दिनांक ८ डिसेंबर २०२१

 ⬛ आजचे राशिभविष्य

दिनांक ८ डिसेंबर २०२१



मेष – आरोग्य उत्तम असेल. कुटुंबाला वेळ द्याल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. व्यावहारिकद़ृष्ट्या लाभदायक दिवस. व्यावसायिक प्रगती होईल.

वृषभ – सरकारी कामांना प्राधान्य द्या. निर्णय घेताना घाई नको. आरोग्याच्या द़ृष्टीने प्रतिकूल दिवस. आत्मविश्वास द़ृढ ठेवणे आवश्यक आहे.

मिथुन – संभ्रमित अवस्था होईल. आरोग्याच्या तक्रारी संभवतात. वरिष्ठांची मतभेद होतील. संयमाने वागा. नियोजित कामांत अडचणी येतील.

कर्क – सामंजस्याने प्रश्न सोडवाल. व्यावसायिकांना लाभदायक दिवस. मनासारख्या घटना घडतील. आत्मविश्वास वाढेल. यशाकडे वाटचाल.

सिंह – शत्रूंवर मात कराल. नोकरदारांसाठी जबाबदारी वाढेल. भागीदारीमधील व्यवसायात नफा होईल. आनंददायी दिवस.

कन्या – प्रेम प्रकरणात अपयश संभवते. वाद-विवादापासून दूर राहावे. आरोग्याच्या तक्रारी संभवतात. गुंतवणूक करण्यास अयोग्य दिवस. मनःस्ताप होण्याची शक्यता.

तूळ- घर, जमिनींच्या कामांत अडचणी येतील. नावलौकिक सांभाळावे लागेल. वाहने सावकाश चालवावीत. आर्थिकद़ृष्ट्या नुकसानकारक दिवस. वादविवादापासून दूर राहावे.

वृश्चिक-आत्मविश्वास निर्माण होईल. व्यावहारिक निर्णय योग्य ठरतील. आर्थिक परिस्थिती सुधारेल. कौटुंबिक कलहामुळे मनःस्ताप होईल.

धनु – वादग्रस्त विधानामुळे त्रास होईल. शब्द मागे घ्यावा लागेल. अनावश्यक खर्चावर नियंत्रण आवश्यक आहे. आर्थिक लाभ संभवतात. कौटुंबिक जबाबदारी वाढेल.

मकर – आवडत्या व्यक्तींचा सहवास लाभेल. मनासारख्या घटना घडतील. कृतज्ञता व्यक्त कराल. व्यावहारिक सावधानता आवश्यक आहे. मनपसंद खरेदी कराल.

कुंभ – आर्थिक ताणतणाव निर्माण होतील. आत्मचिंतनाची गरज. उत्तरार्धात सुवार्ता ऐकायला मिळेल. मेजवानीचे योग संभवतात.

मीन – मित्रमंडळींच्या सहवासाने आनंददायी दिवस जाईल. वैवाहिक समस्यांचे निराकरण होईल. विवाहविषयक आनंददायी वार्ता कानावर येईल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!