इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

MB NEWS-राशिभविष्य (दि. १० डिसेंबर २०२१)

 राशिभविष्य

 (दि. १० डिसेंबर २०२१)




मेष – प्रगतीच्या दिशेने वाटचाल कराल. व्यावसायिक उत्कर्ष होईल. मित्रमंडळींचा सहवास लाभेल. वैवाहिक सौख्य उत्तम राहील. आनंददायी घटना घडतील. आत्मविश्‍वास वाढेल. प्रेम प्रकरणांमध्ये यश मिळेल. प्रवासाचे योग.परस्परांमधे सामंजस्य निर्माण होईल.


वृषभ – प्रतिष्ठा मिळवून देणारी घटना घडेल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे. व्यावसायिक उन्‍नती. कामाचे कौतुक होईल.


मिथुन – संभ्रमित अवस्था होईल. आरोग्याच्या द‍ृष्टीने प्रतिकूल दिवस. नियमांचे पालन आवश्यक आहे. धार्मिक कामांत सहभाग घ्याल. संयम आवश्यक आहे.


कर्क – अस्वस्थता राहील. मनाविरुद्ध घटना घडतील. मनःस्ताप होण्याची शक्यता आहे. जुने आजार उद्भवतील. आर्थिक नियोजन आवश्यक आहे.


सिंह – जीवलगांचा सहवास लाभेल. प्रवासाचे योग. कोर्ट-कचेरीच्या कामांत यश मिळेल. जोडीदाराची साथ लाभेल.


कन्या – नोकरदारांसाठी लाभदायक दिवस. आर्थिक प्रगती होईल. पदोन्‍नतीचे योग. संवादाने प्रश्‍न सुटतील. मातुल घराण्याचे सहकार्य लाभेल.


तूळ – प्रेम प्रकरणात अपयश संभवते. निर्णय घेताना सावधानता बाळगा. संयम आवश्यक आहे.


वृश्‍चिक – क्रोधावर नियंत्रण आवश्यक आहे. कौटुंबिक अस्वास्थ्य राहील. कोणालाही शब्द देऊ नका. वास्तूविषयक कामे लांबणीवर जातील.


धनु – छोटे प्रवास घडतील. कलाकार व लेखकांना आर्थिक लाभ होतील. आत्मविश्‍वास वाढेल. जवळच्या लोकांची मदत होईल. नव्या दिशा व धोरण यामुळे आर्थिक प्रगती होईल.


मकर – आहारावर नियंत्रण आवश्यक आहे. जबाबदारीची जाणीव होईल. आत्मचिंतनाची गरज आहे. व्यावहारिक सतर्कता महत्त्वाची आहे. मनःस्वास्थ्य बिघडवणार्‍या घटना घडतील.

कुंभ – प्रसन्‍नता लाभेल. आवडत्या व्यक्‍तींचा सहवास लाभेल. मनासारख्या घटना घडतील. सामाजिक कार्यात सहभाग घ्याल. अतिथ्यात दिवस जाईल.


मीन – अनावश्यक खर्च होण्याची शक्यता आहे. कोणालाही शब्द देऊ नका. संतुलन साधणे फार महत्त्वाचे आहे. आरोग्याची काळजी आवश्यक आहे. कर्जाच्या प्रकरणात अडचणी येतील.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट