इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

MB NEWS-⬛ काल परळी आगारातून बस सुटली आज चालकाचा आत्महत्येचा प्रयत्न

 ⬛  काल परळी आगारातून बस सुटली आज चालकाचा आत्महत्येचा प्रयत्न


परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

      ३४ दिवसांनंतर काल दि.८ रोजी परळी आगारातून बस सुटली.परंतु यामुळे संपांत फुट पडली.काल परळी आगारातून बस सुटली आणि आज एका चालकाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.


         एसटी कामगारांच्या वतीने गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू आहे.३४ दिवसांनंतर काल दि.८ रोजी परळी आगारातून बस सुटली.परंतु यामुळे संपांत फुट पडली.अनेक दिवसांपासूनच्या कामगारांच्या एकजुटीला तोडण्यात प्रशासन यशस्वी झाले.परंतु आज दि.९ रोजी सकाळी वेगळीच घटना समोर आली आहे.काल परळी आगारातून बस सुटली आणि आज चालकाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.परळी आगारातून काल जी बस सुटली होती त्या बसचा हा चालक असल्याची माहिती समोर येत आहे.नेमका आत्महत्येचा प्रयत्न का केला गेला याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणार्या कामगाराला अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या