इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

MB NEWS- *आज शिवाजी नगर (नाथ टॉकीज परिसर) येथे मारोती मंदिर चा "प्राणप्रतिष्ठा व कलशारोहन समारंभ".* *भाविकांनी उपस्थित रहावे-प्रा पवन मुंडे*

 *आज शिवाजी नगर (नाथ टॉकीज परिसर) येथे मारोती मंदिर चा "प्राणप्रतिष्ठा व कलशारोहन समारंभ".* 



*भाविकांनी उपस्थित रहावे-प्रा पवन मुंडे*


*परळी प्रतिनिधी :* शहरातील शिवाजी नगर,नाथ टॉकीज मागे येथे आज इच्छापूर्ती हनुमान मंदिर ट्रस्ट च्या वतीने येथील मारोती मंदिर च्या *"प्राणप्रतिष्ठा व कलशारोहन समारंभ"* आयोजित केला असून,कार्यक्रमास शहरातील भाविक-भक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन शिवाजी नगर मित्र मंडळ व नगरसेवक प्रा पवन मुंडे यांनी केले आहे.

प्राणप्रतिष्ठा व कलशारोहन समारंभ प्रसंगी आज सकाळी 8 वाजता प्रभू हनुमानाच्या नवीन मूर्ती ची शोभा यात्रा काढण्यात येणार असून तद्नंतर विधिवत पूजा करून मूर्ती ची मंदिरात स्थापना करण्यात येणार असून या वेळी दुपारी 12 ते 2 च्या दरम्यान ह.प.भ.विजयानंद महाराज आघाव, दौणापूरकर यांचे कीर्तन होणार असून किर्तनानंतर महाप्रसाद चा कार्यक्रम होणार आहे.तरी परिसरातील भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवाजी नगर मित्र मंडळ व नगरसेवक प्रा पवन मुंडे यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट