इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS-हेळंब येथील खंडोबा देवस्थानच्या यात्रेनिमित्त खा.डाॅ. प्रितम मुंडे यांनी घेतले दर्शन

 हेळंब येथील खंडोबा देवस्थानच्या यात्रेनिमित्त खा.डाॅ. प्रितम मुंडे यांनी घेतले दर्शन

परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

      परळी तालुक्यातील हेळंब येथील खंडोबा देवस्थानच्या यात्रेनिमित्त आज बीडच्या खा.डाॅ. प्रितम मुंडे यांनी खंडोबाचे दर्शन घेतले.



      मौजे हेळंब येथील ग्रामदैवत श्री.खंडोबा यात्रेस गुरुवारी प्रारंभ झालाआहे. यात्रोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेलेआहे. हेळंब येथे 09 ते 11 डिसेंबर दरम्यान ग्रामदैवत श्री.खंडोबा यात्रा महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे. बोरणा नदीकाठी बोरणाचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेले श्री.खंडोबारायाचे जागृत देवस्थान आहे. आज याठिकाणी बीडच्या खा.डाॅ. प्रितम मुंडे यांनी खंडोबाचे दर्शन घेतले. यावेळी देवस्थानच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट