MB NEWS-हा आहे १२ डिसेंबर चा संकल्प.........! ऊसतोड कामगार, कष्टकऱ्यांच्या समवेत एक दिवस राहून लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांची जयंती साजरी करावी- पंकजा मुंडे

 हा आहे १२ डिसेंबर चा संकल्प.........!

ऊसतोड कामगार, कष्टकऱ्यांच्या समवेत एक दिवस राहून लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांची जयंती साजरी करावी- पंकजा मुंडे

परळी वैजनाथ, प्रतिनिधी– 

     भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे  या दरवर्षी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीदिनी 12 डिसेंबर रोजी एक संकल्प करत असतात. यंदाही त्यांनी एक वेगळा संकल्प केला आहे. याबाबत त्यांनी स्वत: त्यांच्या फेसबुकवर यासंदर्भात व्हिडीओ शेअर केला आहे.


      भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंती दिनी गोपीनाथ गडावर  वेगवेगळ्या सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. मात्र यावर्षी ऊसतोड कामगार, कष्टकऱ्यांच्या समवेत एक दिवस राहून गोपीनाथराव मुंडे यांची जयंती साजरी करावी असे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले आहे. विशेष म्हणजे पंकजा मुंडे सुद्धा या दिवशी ऊसतोड कामगारांसोबत उसाच्या फडावर असणार आहेत. पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे की, यंदा सेवेचा संकल्प करुयात. यावेळी आपण काही वेगळं करुयात. कष्टकरी, मजुरांकडे जा, त्यांची सेवा करा. त्यांना घरातून डबा बनवून नेत खायला घाला, त्यांच्या डब्यातला तुम्ही खा. ज्यांचं मुंडे साहेबांवर प्रेम आहे ते असे कार्यक्रम करतील. आपण केलेल्या उपक्रमाच्या भावना माझ्या सोशल मीडियावर व्यक्त करा. जेव्हा तुम्ही हे काम करत असाल त्यावेळी मी उसतोड कामगारांसोबत हा दिवस घालवणार आहे. हा दिवस कष्टकरी लोकांसाठी साजरा करायचा आहे. हे ज्यावेळी आपण साजरं करत असून त्यापेक्षा मोठा आनंद कोणताही नाही, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार