दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

MB NEWS-⬛ आजचे राशिभविष्य दिनांक ९ डिसेंबर २०२१

 ⬛ आजचे राशिभविष्य

    दिनांक ९ डिसेंबर २०२१

मेष – उत्साहाने कामाला सुरुवात कराल. वैवाहिक सौख्य उत्तम राहील. लाभदायक दिवस. प्रवासाचे योग संभवतात. आवडत्या व्यक्‍तींचा सहवास लाभेल.


वृषभ – प्रसन्‍नता लाभेल. प्रयत्नांना यश मिळेल. पदोन्‍नती होईल. कौतुकास्पद कार्य होईल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. मान-सन्मान होतील.


मिथुन – आहार-विहाराचे नियम पाळण्याची गरज. प्रतिष्ठा पणाला लागेल. अनावश्यक खर्च होईल. व्यवहारिक सतर्कता महत्त्वाची आहे. कामांत अडचणी येतील.


कर्क – मनाविरुद्ध घडलेल्या घटनांमुळे खचून जाऊ नका. आत्मविश्‍वास महत्त्वाचा आहे. आर्थिकद‍ृष्ट्या प्रतिकूल दिवस. वाद-विवादापासून दूर राहा.


सिंह – प्रलंबित कामे पूर्ण होतील. मान-सन्मान होतील. सज्जनांचा सहवास लाभेल. प्रवासाचे योग. कोर्ट-कचेरीच्या कामांत यश मिळेल. व्यावसायिक प्रगती होईल.


कन्या – आरोग्याच्या द‍ृष्टीने अनुकूल दिवस. चांगल्या मित्रमंडळींचा सहवास लाभेल. शत्रूंवर विजय प्राप्त कराल. धनप्राप्तीचे योग. पदोन्‍नतीचे योग. संधीचे सोने कराल.


तूळ – निर्णय घेताना सावधानता न बाळगल्याने परिणामांना सामोरे जावे लागेल. वादविवादापासून दूर राहा. कामांचे नियोजन करा. खर्चावर नियंत्रण ठेवा. एकाग्रता आवश्यक आहे.


वृश्‍चिक – नकारात्मक विचार अनावश्यक भीती निर्माण करतील. कौटुंबिक अस्वास्थ्य राहील. आर्थिक गुंतवणूक नको.संतुलन साधणे फार महत्त्वाचे आहे.


धनु – मित्रमंडळींच्या सहकार्याने लाभ होतील. कलागुणांना वाव मिळेल. आर्थिक प्रगती होईल. खरेदीचे योग. प्रयत्नांना यश मिळेल. कलागुणांना वाव मिळेल.


मकर – लोकांच्या निंदेकडे लक्ष देऊ नका. वाणीवर नियंत्रण आवश्यक आहे. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. वस्तू सांभाळून ठेवा. कौटुंबिक जबाबदारी वाढेल.


कुंभ- मनासारख्या घटना घडतील. सुवार्ता ऐकायला मिळेल. प्रसन्‍नता लाभेल. यशाकडे वाटचाल कराल. खरेदीचा दिवस.


मीन – उत्साह आवश्यक आहे. आळस सोडायला हवा. स्वावलंबन आवश्यक आहे. कामांचे नियोजन करा. एकाग्रता आवश्यक आहे. स्मृती रंजनात दिवस जाईल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....