इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

MB NEWS-लोकनेत्याच्या जयंतीदिनी गोपीनाथ गडावर रक्तदान व रक्तगट तपासणी शिबीराचे आयोजन* *शिबीरात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा - गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानचे आवाहन* _रक्तदान करून गरजू रूग्णांना द्या मदतीचा हात_

 *लोकनेत्याच्या जयंतीदिनी गोपीनाथ गडावर रक्तदान व रक्तगट तपासणी शिबीराचे आयोजन*

*शिबीरात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा - गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानचे आवाहन*

_रक्तदान करून गरजू रूग्णांना द्या मदतीचा हात_


परळी । दिनांक ०९।

लोकेनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त येत्या १२ डिसेंबर रोजी गोपीनाथ गडावर भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या पुढाकाराने रक्तदान व रक्तगट तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे, या शिबिरात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभाग नोंदवून गरजू रूग्णांना मदतीचा हात द्यावा असे आवाहन गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.


   गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान आणि श्रीमान रामभाई शाह ब्लड बॅक बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने १२ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४ वा. दरम्यान गोपीनाथ गडावर रक्तदान व रक्तगट तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. अनेक गोरगरीब रुग्णांना दुर्धर आजारात रक्ताची गरज भासते, अशा वेळेस रक्तदान शिबीरातून झालेल्या रक्तदानाचा त्यांना उपयोग होतो, रक्तदात्यांनी जास्तीत जास्त संख्येने शिबीरात सहभाग घेऊन रक्तदान केल्यास त्याचा उपयोग गरजू रूग्णांना होणार आहे. या शिबिरात इच्छूकांना त्यांचा रक्तगटही तपासता येणार आहे. रक्तदानासारख्या महान कार्यात हातभार लावून शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानने केले आहे.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या