इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS- *डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाराष्ट्र विद्यालयात अभिवादन*

 *डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाराष्ट्र विद्यालयात अभिवादन* 

परळी वै: दि. 06 भारतीय संविधानाचे शिल्पकार प्रज्ञासूर्य, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाराष्ट्र विद्यालय,मोहा याठिकाणी अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला.


या अभिवादन कार्यक्रमास महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे जेष्ठ संचालक श्री.सुदामदादा देशमुख, श्री.सुदाम शिंदे,शाळेचे मुख्याध्यापक श्री.चंद्रशेखर साखरे,पर्यवेक्षक श्री.विनायक राजमाने आदी प्रमुख व्यक्तीगण उपस्थित होते.


या अभिवादन कार्यक्रमात शाळेतील सहशिक्षक ब्रम्हानंद देशमुख यांनी डॉ.बाबासाहेब यांच्या जीवन कार्यावर उजाळा देत डॉ.बाबासाहेबांचे जीवन कसे आदर्शवत व अनुकरणीय आहे हे सांगितले तर श्री.मुकुंद चौधरी यांनी डॉ.बाबासाहेबांच्या संविधानामुळे अठरा पगड जाती-धर्माचा आपला देश एकसंघ आहे याबद्दल मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास गिरी तर आभार व्यक्त हनुमंत वाघमोडे यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!