MB NEWS-*हेळंब येथे श्री. खंडोबा मंदिरात तीन दिवसशीय यात्रोत्सव 9 ते 11 डिसेंबर पासून प्रारंभ* *पालखी सोहळा, वाघ्या मुरळी, कुस्त्यांची दंगलीसह विविध कार्यक्रमाचे आयोजन*

 *हेळंब येथे श्री. खंडोबा मंदिरात तीन दिवसशीय यात्रोत्सव 9 ते 11 डिसेंबर पासून प्रारंभ*

*पालखी सोहळा, वाघ्या मुरळी, कुस्त्यांची दंगलीसह विविध कार्यक्रमाचे आयोजन*


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  मौजे हेळंब येथील ग्रामदैवत श्री.खंडोबा यात्रेस गुरुवारी प्रारंभ होत आहे. यात्रोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषाने रविवारपासून मंदिर परिसर दुमदुमू लागला आहे. 

     हेळंब येथे 09 ते 11 डिसेंबर दरम्यान ग्रामदैवत श्री.खंडोबा यात्रा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. बोरणा नदीकाठी बोरणाचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेले श्री.खंडोबारायाचे जागृत देवस्थान आहे.  या निमित्त गुरुवारी दुपारी १ वा. श्री खंडोबाची पालखी मिरवणुक निघणार आहे. रात्री १२ वाजता शोभेची दारु उडवून अतिषबाजी केली जाणार आहे व २१ तोफांची सलामी दिली जाणार आहे. शुक्रवारी रात्री ८ ते १२ दरम्यान वाग्या मुरळीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.  शनिवारी, दि.11  डिसेंबर दुपारी २ वाजता जंगी कुस्त्याचा कार्यक्रम होणार आहेत. जंगी कुस्त्यासाठी प्रथम पारितोषिक ७,००१/- ठेवण्यात आले आहे. पोलिस उपविभागीय अधिकारी सुनिल जायभाये, पोलिस निरीक्षक मारूती मुंडे यांची उपस्थिती राहणार आहे. 

     हेळंब येथे जागृत असे श्री.खंडोबाचे मंदिर आहे. चंपाषष्ठी निमित्त हेळंब येथे गुरुवार पासुन तीन दिवशीय यात्रेस प्रारंभ होत आहे. यात्रेची तयारी जय्यत करण्यात आली आहे. विविध खेळणी साहित्याचे दुकाने गावात थाटण्यात आली आहे. गुरुवारी राज्याच्या कानाकोपर्‍यातुन खंडोबाच्या दर्शनासाठी हेळंब मध्ये हजारोंच्यावर भाविक दाखल होणार आहेत. 

    नवस केला की पावतो अशी श्रद्धा आहे त्यामुळे भाविक नवस बोलतात फळ मिळाल्यास ते नवस पूर्ण करतात. यासाठी पंचक्रोशीतील व ग्रामस्थ कितीही बाहेर असले तरी यात्रेनिमित्त ते दर्शनासाठी आवर्जून येतात. मुंबई, पुणे, औरंगाबाद, हैदराबाद आणि अनेक राज्यातून भाविक दर्शनासाठी येतात. खंडोबा मंदिर हे जागृत देवस्थान आहे. चंपाषष्ठीला  तीन दिवशीय यात्रा भरते, गुरुवारी हेळंब येथील श्री हनुमान मंदिरापासुन श्री खंडेरायाच्या मुर्तीची मिरवणुक वाजत गाजत निघते, एक किलोमिटर अंतरावर असलेल्या खंडोबा मंदिरात ही पालखी येते, पुन्हा ही पालखी गावातुन जाते. या पालखी सोहळ्यात हेळंब व परिसरातील ग्रामस्थ उत्साहाने सहभागी होतात. सायंकाळी हेळंब येथे वाघ्या मुरळ्याचा कार्यक्रम घेण्यात येतो व शनिवारी भव्य कुस्त्याच्या स्पर्धा आयोजीत करण्यात आल्या आहेत. तीन दिवशीय यात्रेत परळी तालुक्यातील व राज्यातील अनेक ठिकाणाहुन भक्त सहभागी होतात व खंडोबाचे मनोभावे दर्शन घेतात. या यात्रेची ग्रामस्थांनी जोरदार तयारी केली आहे.  तीन दिवसीय यात्रेत दर्शनासाठी परळी व परिसरातील ग्रामीण भागातुन भाविक भक्त मोठ्या प्रमाणात येतात. हेळंबच्या गावकरी मंडळाच्या वतीने भव्य यात्रा महोत्सव आयोजित करण्यात येतो. या यात्रा उत्सवात भाविकांनी सहभागी व्हावे असे आवाहन सरपंच श्रीमती लक्ष्मीबाई होळंबे, उपसरपंच सौ.लक्ष्मी पाळवदे, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ हेळंब यांनी केले आहे.


श्री खंडोबा यात्रेनिमित्त विविध कार्यक्रम 


 श्री खंडोबा मंदिर हे भव्य दिव्य आहे. खंडोबा मंदिरात प्राचीन काळापासून यात्रा भरते. मंदिरात लक्षवेधी व आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या यात्रेची ग्रामस्थांनी जोरदार तयारी केली आहे. चंपाषष्ठीच्या आदल्या दिवशी नागदिव्ये घेऊन भाविक खंडोबा मंदिरात व देवासमोर नागदेवे पाजळून मानाचे पाच व ताट भर दिपोत्सव साजरा करतात.  सर्व मंदिर दिपत्सोवाने उज्जवलुन खंडोबाची आराधना करतात.दिवसभर मंदिर परिसरात गावातील व परिसरातील भाविक  तळीभांडार उचलणे, ओटी भरणे, भंडारा खोबरे उधळणं आदि कार्यक्रमास सुरुवात करतात व रात्री १० वाजता श्रींचा अश्वरूपी मूर्तीसह सवाद्य छबिना मिरवणूक काढून मंदिराला प्रदक्षिणा घालण्यात येते. यावेळी हलगीच्या तालावर खंडोबाचे वारू शिव मल्हार येळकोट. येळकोट घे च्या जय जयकारात बेभान होऊन  नाचतात हे विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.


घरोघरी तळी भंडारा 


भाविक आपल्या घरी चंपाषष्ठी दिवशी. देवाच्या ताब्यांचे कोंटुबाची पुजा करून. वाग्यांचे भरीत, बाजरीची रोडगे, काद्यांची पात इत्यादी पदार्थांचा भरीताचा व नैवेद्य ठेऊन पाच वेळा सदानंदाचा येळकोट येळकोट जय चा गजर करून. तळी भंडारा कार्यक्रम होतो व नवीन वागीं व कांदा खाणास प्रारंभ होतो. 


खंडेरायाला खोबर व भंडाऱ्याची उधळण 


   खंडोबाला चंपाषष्टी दिवशी तालुक्यातील सर्व भाविक खंडोबा मंदीरात येऊन. सदानंदाचा येळकोट येळकाेट जय मल्हार चा गजरात खोबर भंडाराची उधळण होते. खोबर व भंडारा मंदिरावर उधलेला भक्तजन प्रसाद म्हणून घेतात. व आपल्या कपाळावर भंडारा लावतात अशी माहिती भाविक ग्रामस्थांनी दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !