इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

MB NEWS- *खा. शरदचंद्र पवार यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त परळीत धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात 11 व 12 डिसेंबर रोजी शरदोत्सवाचे आयोजन* *विविध सामाजिक उपक्रमांनी होणार खा. पवार साहेबांचा वाढदिवस साजरा*

 *खा. शरदचंद्र पवार यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त परळीत धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात 11 व 12 डिसेंबर रोजी शरदोत्सवाचे आयोजन*

*विविध सामाजिक उपक्रमांनी होणार खा. पवार साहेबांचा वाढदिवस साजरा*


परळी (दि. 08) ---- : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त परळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली तथा नगर परिषदेचे गटनेते वाल्मिक अण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली 11 व 12 डिसेंबर असे दोन दिवस शरदोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.


यांतर्गत विविध सामाजिक उपक्रम राबविले जाणार असून, खा. पवार साहेबांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात मुख्यमंत्री स्वयंरोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेल्या वाहनांचे वितरण, संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थींना मंजुरी पत्राचे वितरण, तसेच राष्ट्रवादी सेवा सप्ताहात नाव नोंदणी केलेल्या 200 विधवा महिलांना पिठाच्या गिरणीचे वाटप आदी उपक्रम ना. धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत राबवले जाणार आहेत. 


सुप्रसिद्ध कलाकार मंगेश निपाणीकर यांनी खास तयार केलेल्या खा. पवार साहेबांच्या 20 हजार चौरस फूट तैलचित्र यानिमित्ताने परळी येथील तहसील कार्यालयासमोरील मैदानात पाहायला मिळणार आहे. 


तर 12 डिसेंम्बर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यभरात आयोजित केलेल्या व्हर्च्युअल रॅलीचे स्व. गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदिर येथे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे व सायंकाळी 7 वा. वैद्यनाथ मंदिर परिसरात दीपोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या सर्व उपक्रमांना कोविड विषयक नियमांचे पालन करून उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण तात्या पौळ व शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या