MB NEWS-पत्रकार दत्तात्रय काळे यांचा सन्मान

 पत्रकार दत्तात्रय काळे यांचा सन्मान 


परळी (प्रतिनिधी)

पत्रकार दत्तात्रय काळे यांनी आयआरडीए च्या परीक्षेत यश मिळवून लागलीच कामाला लागत केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांचा नुकताच सन्मान करण्यात आला. मंगळवारी परळी वैजनाथ येथील रिलायन्स इन्शुरन्स कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

परळी वैजनाथ येथील पत्रकार दत्तात्रय काळे यांनी विमा क्षेत्रात दमदार पदार्पण केले आहे. नुकतीच त्यांनी आयआरडीएची पात्रता परीक्षा दिली होती, त्यात त्यांनी यश मिळवले. त्यांच्या या दोन्ही यशाबद्दल परळीतील रिलायन्स इन्शुरन्स कार्यालयात सन्मान करण्यात आला. शाल, श्रीफळ, फेटा आणि पुष्पहार देऊन सत्कार करत त्यांचे अभिनंदन आणि पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी परळी शाखा व्यवस्थापक राजेश गीते, सहाय्यक व्यवस्थापक श्रीहरी शिवदे, मार्गदर्शक तथा विमा सल्लागार वंदना कांबळे, पत्रकार मोहन व्हावळे, संभाजी मुंडे यांच्यासह रिलायन्स इन्शुरन्स परळी शाखेच्या सर्व कर्मचारी वृंदाची उपस्थिती होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!