MB NEWS-महिला महाविद्यालयाच्या वनस्पती व प्राणीशास्त्र विभागाची वाण धरणाला क्षेत्रभेट

 महिला महाविद्यालयाच्या वनस्पती व प्राणीशास्त्र विभागाची वाण धरणाला क्षेत्रभेट



परळी वैजनाथ, प्रतिनिधी

        येथील कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र व प्राणीशास्त्र विभागाच्या वतीने नागापुर येथील वाण धरणावर क्षेत्रभेट उपक्रम राबवण्यात आला.


       महिला महाविद्यालयातील बीएससी प्रथम द्वितीय तृतीय वर्षाच्या विद्यार्थिनींची वाण धरण परिसरात क्षेत्रभेट आयोजित करण्यात आली होती. या ठिकाणी विद्यार्थिनींनी धरण परिक्षेत्रातील विविध वनस्पती व प्राणी यांची प्रत्यक्ष पाहणी करत नागापूर पाणीपुरवठा शुद्धीकरण केंद्राला भेट दिली. त्याचप्रमाणे या क्षेत्रभेटीत विविध माहिती संकलित केली.


.  यावेळी वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.संगीता कचरे,प्रा.डॉ. वर्षा मुंडे, प्राणीशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ. विद्या गुळभिले,प्रा.डॉ. शरद रोडे ,महाविद्यालयाचे कर्मचारी अनिल कट्टे ,राजेश्वर देशमुख आदींसह विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !