MB NEWS-राहुल गांधींच्या निषेधार्थ परळीत भाजप रस्त्यांवर

 स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत बेताल वक्तव्य: परळीत भाजपचे राहुल गांधीच्या निषेधार्थ 'जोडे मारो' आंदोलन


परळी वैजनाथ,   प्रतिनिधी....

       भारत जोडो या पदयात्रे अंतर्गत महाराष्ट्रातील वाशीम जिल्ह्यात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी  स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबाबत आज परळीत भाजपा राष्ट्रीय सचिव मा.पंकजाताई मुंडे व खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या सूचनेनुसार भारतीय जनता पार्टी व भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने जोडे मारो आंदोलन करण्यात आले. जोरदार घोषणाबाजी करत राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले.



Video News:-● *निषेध-आंदोलन: एकीकडे राहुल गांधींची पदयात्रा 'भारत जोडो' | परळीत भाजपचे 'जोडे मारो-झोडो ' |* #mbnews #subscribe #like #share #comments

   

 

 शहरातील राणी लक्ष्मीबाई टॉवर परिसरात भाजप कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारून आपला रोष व्यक्त केला.यावेळी राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारत प्रचंड घोषणाबाजी केली तसेच बेताल वक्तव्याचा विरोध करत निषेध नोंदवला.यावेळी भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, ,मा.नगराध्यक्ष वैजनाथ तात्या जगतकर, महादेव इटके,राजेंद्र ओझा, ॲड.राजेश्वर देशमुख,ज्येष्ठ नेते चंद्रकांत समशेट्टी,दत्ता काका कुलकर्णी,मोहन जोशी,नरेश पिंपळे,  भारतीय जनता युवा मोर्चा चे प्रदेश सचिव ॲड.अरुण पाठक,योगेश पांडकर, आश्विन मोगरकर,गोविंद चौरे, अनिश अग्रवाल,नितीन समशेट्टी,किशोर केंद्रे,बंडू नाना कोरे,दिलीप नेहरकर, सुशील हरंगुळे, श्रीनिवास राऊत,राजेश कौलवर,शाम गित्ते,दीपक जोशी,पवन तोडकरी,दीपक जगतकर, वेताळ महराज,दीपक गीते, दिनेश लोंढे ,बाळू फुले, अभिजित गुट्टे,राहूल घोबाळे, प्रवीण तोताडे, रघुवीर राडिकर व सर्व भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्वातंत्रवीर सावरकर प्रेमी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार