प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

MB NEWS-शेख शरीफ यांची फेरनिवड

 एआयएमआयएम च्या परळी तालुका अध्यक्षपदी शेख शरीफ यांची फेरनिवड




परळी वैजनाथ:

एआयएमआयएम च्या परळी तालुका अध्यक्षपदी शेख शरीफ यांची फेरनिवड करण्यात आली आहे.

     

एआयएमआयएम च्या परळी तालुका अध्यक्षपदी शेख शरीफ भाई यांची फेरनिवड करण्यात आली असून एआयएमआयएम चे राष्ट्रीय अध्यक्ष खा. आ.असदोद्दीन ओवेसी , आ. अकबरुद्दीन ओवेसी, प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील, कार्याध्यक्ष डॉ. गफार कादरी, मराठवाडा अध्यक्ष, फेरोज लाला, सय्यद मोहीम यांच्या आदेशानुसार बीड जिल्हाध्यक्ष शफीक भाऊ यांनी शेख शरीफ  यांच्या कामाची दखल घेत येत्या सर्व निवडणुकींमध्ये यश प्राप्त करण्यासाठी परळी तालुका अध्यक्षपदी शरीफ यांची नियुक्ती पत्र देऊन फेर निवड करण्यात आली. या निवडीमुळे परळी शहरासह तालुक्यातील कार्यकर्ते व पदाधिकारी खूष झाल्याचे पहावयास मिळाले. परळी तालुकाध्यक्ष पदाची योग्य निवड केल्या बद्दल कार्यकर्त्यांनी पक्षाचे आभार व्यक्त केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या