MB NEWS-दुुचाकी चोरी: पोलिस तपास गांभीर्याने नाही ;घंटानाद आंदोलनाचा इशारा

 दुुचाकी चोरी: पोलिस तपास गांभीर्याने नाही ;घंटानाद आंदोलनाचा इशारा



परळी (प्रतिनीधी)

 संभाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतुन दि.8 नोव्हेंबर रोजी संपादक मोहन वाव्हळे यांची दुचाकी चोरट्यांनी लंपास केली.या घटनेला आठ दिवस उलटुन गेले तरी पोलिसांना चोरांचा तपास लागलेला नाही.पोलिसांच्या तपास यंत्रणेला आव्हान देत या घटनेनंतरही शहरातुन दुचाकी चोरीच्या घटना होत आहेत.व्हावळे यांच्या दुचाकीचा तपास लावावा अन्यथा संभाजीनगर पोलिस ठाण्यासमोर घंटानाद आंदोलन करण्याचा इशारा सामाजीक कार्यकर्त्यांनी दिला आहे.


संबंधित बातमी:■ *चोरांपुढे परळीच्या पोलीसांचा वचक संपला : घरफोड्या, वाहन चो-या, मोबाईल चो-या, बाजारातील चो-या, भुरट्या चो-यांचा परळीत धुमाकूळ* • *_शहरातील सीसीटीव्ही यंत्रणा बनली शोभेची...!_*


  संपादक मोहन व्हावळे यांची दुचाकी क्र.एम.एच.44 एन 8335 या क्रमांकाची हिरो कंपनीची दुचाकी दि.8 नोव्हेंबर रोजी चोरट्यांनी हँन्डललॉक तोडुन लंपास केली.याबाबतची फिर्याद संभाजीनगर पोलिस ठाण्यात देवुनही व शहरात असलेल्या सीसीटिव्ही मध्ये चोरटे दुचाकी लंपास करत असल्याचे स्पष्ट दिसत असताना या संभाजीनगर पोलिस मात्र गांभिर्याने घेत नसल्याने परळीतील सामाजीक कार्यकर्ते व पत्रकारांनी संभाजीनगर पोलिसांना निवेदन देवुन दुचाकी चोरीचा तपास त्वरीत लावावा अन्यथा घंटानाद आंदोलन करण्याचा इशारा या निवेदनाद्वारे दिला आहे.एरव्ही लहान सहान घटनांचा तपास लावुन पत्रकारांमार्फत प्रसिध्दी करुन घेणार्या पोलिस यंत्रणेला पत्रकारांचीच दुचाकी चोरीस जावुन आठ दिवसानंतरही तपास लागत नसल्याने संभाजीनगर पोलिसांच्या या तपासी भुमिकेची परळीकरांतुन खिल्ली उडवली जात आहे.

संबंधित बातमी:*परळीत आपले वाहन पार्क करताना सावधान !* *_हॉटेलमध्ये जेवून येईपर्यंत तुमचे वाहन होऊ शकते गायब_*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार