MB NEWS- स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिन: बाळासाहेबांची शिवसेनेच्या वतीने विविध कार्यक्रम

 स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिन: बाळासाहेबांची शिवसेनेच्या वतीने विविध कार्यक्रम


परळी वैजनाथ:-

                         बाळासाहेबांची शिवसेना मुख्य सचिव संजय मोरे यांच्या आदेशानुसार जिल्हा प्रमुख  सचिन मुळूक यांच्या सूचनेनुसार स्व बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त, गावभागातील गणेशपार येथे स्व बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन गणेधपार भागातील जेष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आल्या व बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा जय घोषणा देण्यात येऊन स्व बाळासाहेबांच्या स्मृतीस उजाळा देण्यात आला.


    परळी शहरातील उपजिल्हा रुग्णालयात पद्मशाली समाज बीड जिल्हा अध्यक्ष डॉ राम पँटेवार,व सामाजिक कार्यकर्ते विलास ताटे यांच्या हस्ते रुग्णांना फळे वाटप करण्यात आली. याप्रसंगी, उपजिल्हा रुग्णालया अधीक्षक डॉ अरुण गुट्टे ,वैद्यकीय अधिकारी डॉ  दिनेश कुरमे व उपजिल्हा रुग्णालयातील सर्व आरोग्य परिचारिका,आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात उत्कृष्ठ सेवा दिल्याबद्दल  बाळासाहेबांची शिवसेनेच्य वतीने यथोचित सत्कार व सन्मान करण्यात आला.


        सामाजिक बांधिलकी भावनेतून वैद्यनाथ मंदिर परिसरातील निराधारांना फळ वाटप करण्यात आले. यावेळी बाळासाहेबांची शिवसेनेचे सचिन स्वामी,बालासाहेब देशमुख, संजय गावडे, सागर बुंदूले,उत्तमदादा लोखंडे,नवनाथ सरवदे, रमेश लोखंडे,गोविंद चिवडे,दीपक जोशी,गणेश देशमुख,जगन्नाथ कदम,हरिभाऊ लोखंडे,अर्जुन कदम,बालाजी धुमाळ,यांच्या सह ईतर बाळासाहेबांची शिवसेनेचे शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार