युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS:मुंबईत पोहोचताच पंतप्रधान, केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्र्यांना पाठवले पत्र

 हज यात्रेकरूंच्या प्रश्नांसाठी पंकजाताई मुंडे सरसावल्या !


मुंबईत पोहोचताच पंतप्रधान, केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्र्यांना पाठवले पत्र

विमान प्रवासाच्या तिकिट दरातील तफावत दूर करण्यासाठी यात्रेकरूंच्या शिष्टमंडळाने बीड येथे घेतली होती भेट


बीड ।दिनांक ०८।

हज यात्रेसाठी जाणाऱ्या मराठवाडयातील यात्रेकरूंच्या विमान प्रवासातील तिकिट दरात झालेली तफावत तात्काळ दूर करावी अन्यथा मुस्लिम बांधव हया पवित्र यात्रेला जाऊ शकणार नाहीत यासाठी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री स्मृती इराणी यांना आज पत्र पाठवून यासंदर्भात तातडीने कार्यवाही करण्याची विनंती केली.


   जिल्हयातील तसेच मराठवाड्यातून  मुस्लिम बांधव हज २०२३ साठी जाणार आहेत. छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथून विमानाने हजसाठी रवाना होणाऱ्या बांधवांना यंदा तांत्रिक कारणामुळे ८८ हजार रूपये जादा भाडे द्यावे लागत आहे. या संदर्भात काल संध्याकाळी मुस्लिम बांधवांच्या एका शिष्टमंडळाने पंकजाताई मुंडे यांची भेट घेऊन हा प्रश्न सोडविण्याची मागणी केली होती. मी स्वत: जातीने लक्ष घालुन हा प्रश्न प्राधान्याने  सोडविण्याचा शब्द त्यांनी दिला होता, त्यानुसार आज सकाळी त्यांनी मुंबईत पोहोचताच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अल्पसंख्यांक मंत्र्यांना पत्र लिहून यावर त्वरेने कार्यवाही करण्याची विनंती केली. 


 हज यात्रेसाठी मुंबईहून विमानाने जाण्यासाठी ३ लाख ४ हजार ८४३ रुपये प्रवास भाडे आकारण्यात येत आहे. तर त्याच प्रवासासाठी छत्रपती संभाजीनगर येथुन ३ लाख ९२ हजार ७३८ रुपये भाडे निश्चित करण्यात आले आहे. यामुळे मराठवाड्यातून हजला जाणाऱ्या मुस्लिम भाविकांना प्रति व्यक्ती ८८ हजार रुपये जास्तीचे मोजावे लागणार आहेत. इतर जिल्ह्याच्या तुलनेत ही खुप मोठी तफावत आहे. हे अतिरिक्त प्रवास भाडे कमी करावे अथवा मुंबई येथुन हजला जाण्यासाठी व्यवस्था करावी यासाठी संदर्भात भाजपाचे अल्पसंख्यांक नेते सलीम जहांगीर यांनी शिष्टमंडळासह पंकजाताई मुंडे यांची भेट घेतली होती. सकाळी मुंबईला पोहोचताच पंकजाताईंनी पंतप्रधान आणि स्मृती इराणी यांना पत्र पाठवून हज यात्रेकरूंचा प्रश्न त्यांच्या कानावर घातला आणि यावर १५ मे च्या आत कार्यवाही करण्याची विनंती केली.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या