MB NEWS:नानाभाऊ शिंदे यांचे निधन ;पत्रकार वसुदेव शिंदे यांना पितृशोक

 नानाभाऊ शिंदे यांचे निधन ; पत्रकार वसुदेव शिंदे यांना पितृशोक 


अंबा सह.साखर कारखान्यातील कर्मचारी तथा पत्रकार वसुदेव शिंदे यांचे वडील नानाभाऊ त्रिबंकराव शिंदे  (वय ११४ वर्षे) यांचे बुधवार १० जुन रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.

        नानाभाऊ त्रिबंकराव शिंदे हे स्वभावाने अतिशय मनमिळावू होते दुसऱ्या सुख-दुःखात सहभागी होणे हे त्यांच्या स्वभावाचे वैशिष्ट्ये म्हणावे लागेल. तसेच धार्मिक वृत्ती असल्याने पंढरपुरची वारी कधीही चुकू दिली नाही परिसरातील धार्मिक-सामाजिक, सांस्कृतिक सोहळ्यात ते नेहमीच अग्रेसर असत. आपल्या संस्कारातून मुलांना योग्य मार्गदर्शन देवून उत्तम पद्धतीने त्यांची जडण-घडण व्हावी या उद्देशाने त्यांनी आयुष्यभर कार्य केले. त्यांचा अंत्यविधी त्यांच्या गावी होळ येथे दुपारी स्मशानभूमीत करण्यात आला. त्यांच्या पश्चात तीन मुले दोन मुली सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. या अंत्यसंस्कार विधी समयी  सर्वस्तरांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पत्रकार वसुदेव शिंदे यांचे ते वडील होते

================

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !